धुळे जिल्ह्यात किसान सन्मान योजनेत दोन लाखांवर शेतकऱ्यांची नोंदणी

धुळे जिल्ह्यात किसान सन्मान योजनेत दोन लाखांवर शेतकऱ्यांची नोंदणी
धुळे जिल्ह्यात किसान सन्मान योजनेत दोन लाखांवर शेतकऱ्यांची नोंदणी

धुळे : जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत पात्र शेतकऱ्यांना सामावून घेण्यासाठी २४ व २५ ऑगस्टला गावनिहाय मेळावे होतील. आतापर्यंत जिल्ह्यात दोन लाख १२ हजार लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे. पात्र शेतकऱ्यांनी आवश्‍यक कागदपत्रे तलाठ्यांकडे द्यावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले.  जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी म्हटले आहे, की अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. योजनेअंतर्गत मार्गदर्शक सूचनेनुसार १८ ते ४० वर्षे वयोगटातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी नोंदणीस प्राप्त होईल. वयानुसार रक्‍कम ५५ ते २०० रुपये प्रतिमहा मासिक हप्ता वयाचे ६० वर्षे पूर्ण होईपर्यंत पेन्शन फंडामध्ये जमा करावा लागेल. या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचे सर्व ठिकाणचे मिळून लागवडीलायक क्षेत्र दोन हेक्‍टरपर्यंत असेल, अशा पात्र शेतकरी कुटुंबास दोन हजार रुपये प्रतिहप्ता याप्रमाणे तीन हप्त्यांत सहा हजार रुपये प्रतिवर्ष लाभ मिळेल.  यात आधार कार्ड, बॅंकेचे पासबुकाची झेरॉक्‍स तलाठी कार्यालयात जमा करावी. या नोंदणी मोहिमेचे मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी पर्यवेक्षण करतील. पात्र शेतकरी कुटुंबांची नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी ते सोडवतील. पुढील दहा दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. देशात प्रधानमंत्री किसान मानधन योजना लागू झाली असून, धुळे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. त्यासाठी सामाईक सुविधा केंद्रांवर (सीएससी) नावनोंदणी करावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी या वेळी केले. जिल्ह्यात दोन लाख १२ हजार ४३७ पात्र शेतकरी कुटुंब आहेत. त्यांपैकी ४८ हजार २७१ पात्र शेतकरी कुटुंबांच्या बचत खात्यात पहिला हप्ता वितरित केला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com