Agriculture news in marathi; Registration of two lakh farmers in Kisan Samman Yojana in Dhule district | Agrowon

धुळे जिल्ह्यात किसान सन्मान योजनेत दोन लाखांवर शेतकऱ्यांची नोंदणी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

धुळे : जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत पात्र शेतकऱ्यांना सामावून घेण्यासाठी २४ व २५ ऑगस्टला गावनिहाय मेळावे होतील. आतापर्यंत जिल्ह्यात दोन लाख १२ हजार लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे. पात्र शेतकऱ्यांनी आवश्‍यक कागदपत्रे तलाठ्यांकडे द्यावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले. 

धुळे : जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत पात्र शेतकऱ्यांना सामावून घेण्यासाठी २४ व २५ ऑगस्टला गावनिहाय मेळावे होतील. आतापर्यंत जिल्ह्यात दोन लाख १२ हजार लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे. पात्र शेतकऱ्यांनी आवश्‍यक कागदपत्रे तलाठ्यांकडे द्यावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले. 

जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी म्हटले आहे, की अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. योजनेअंतर्गत मार्गदर्शक सूचनेनुसार १८ ते ४० वर्षे वयोगटातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी नोंदणीस प्राप्त होईल. वयानुसार रक्‍कम ५५ ते २०० रुपये प्रतिमहा मासिक हप्ता वयाचे ६० वर्षे पूर्ण होईपर्यंत पेन्शन फंडामध्ये जमा करावा लागेल. या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचे सर्व ठिकाणचे मिळून लागवडीलायक क्षेत्र दोन हेक्‍टरपर्यंत असेल, अशा पात्र शेतकरी कुटुंबास दोन हजार रुपये प्रतिहप्ता याप्रमाणे तीन हप्त्यांत सहा हजार रुपये प्रतिवर्ष लाभ मिळेल. 

यात आधार कार्ड, बॅंकेचे पासबुकाची झेरॉक्‍स तलाठी कार्यालयात जमा करावी. या नोंदणी मोहिमेचे मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी पर्यवेक्षण करतील. पात्र शेतकरी कुटुंबांची नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी ते सोडवतील. पुढील दहा दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. देशात प्रधानमंत्री किसान मानधन योजना लागू झाली असून, धुळे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. त्यासाठी सामाईक सुविधा केंद्रांवर (सीएससी) नावनोंदणी करावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी या वेळी केले. जिल्ह्यात दोन लाख १२ हजार ४३७ पात्र शेतकरी कुटुंब आहेत. त्यांपैकी ४८ हजार २७१ पात्र शेतकरी कुटुंबांच्या बचत खात्यात पहिला हप्ता वितरित केला आहे. 


इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गात...जळगाव : जिल्हा परिषद शाळांमधील...
पुणे विभागात चारा पिकांच्या पेरणीवर भरपुणे ः उन्हाळ्यात जनावरांना चाऱ्याची अडचण येऊ नये...
सांगली जिल्ह्यात द्यापही तूर खरेदी सुरू...सांगली : शासनाने हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी...
आटपाडीत डाळिंब उत्पादकांना विमा भरपाईची...आटपाडी, जि. सांगली : यावर्षी पावसातील सुरुवातीचा...
मक्यावरील अळीमुळे शेतकरी चिंतातुरअकोला ः जिल्ह्यात या रब्बीत लागवड झालेल्या...
अधिकाऱ्यांच्या खेळात नाचणी उत्पादक वेठीसकोल्हापूर: उन्हाळ्यात नाचणी घेऊन पन्हाळा पश्‍चिम...
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...