Agriculture news in marathi Regular arrival of vegetables in Kolhapur | Agrowon

कोल्हापुरात भाजीपाल्याची नियमित आवक 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 एप्रिल 2020

कोल्हापूर : येथील बाजार समितीत सोमवारी (ता. २०) नियमित सौदे झाले. गेल्या तीन दिवसांपासून भाजीपाल्याचे सौदे बंद होते. शनिवार (ता. १९) पासून सौद्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी २२० गाड्या शेतमाल सांगली, कर्नाटक सीमा भागातून आल्या. यामध्ये ढोबळी मिरची, फ्लॉवर, कोबी आदी भाजीपाल्याची आवक लक्षणीय होती. भाजीपाल्याबरोबर कोकणातून हापूस आंब्याची आवक झाली. 

कोल्हापूर : येथील बाजार समितीत सोमवारी (ता. २०) नियमित सौदे झाले. गेल्या तीन दिवसांपासून भाजीपाल्याचे सौदे बंद होते. शनिवार (ता. १९) पासून सौद्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी २२० गाड्या शेतमाल सांगली, कर्नाटक सीमा भागातून आल्या. यामध्ये ढोबळी मिरची, फ्लॉवर, कोबी आदी भाजीपाल्याची आवक लक्षणीय होती. भाजीपाल्याबरोबर कोकणातून हापूस आंब्याची आवक झाली. 

प्रशासनाच्या आवाहनानुसार बाजार समिती व्यवस्थापनाने विक्रेत्यांना पासेस देण्याची सोय केली आहे. यामुळे बाजार समितीच्या कार्यालयात हे पासेस घेण्यासाठी विक्रेत्यांनी गर्दी केली होती. सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी शाहूपुरी पोलिस व बाजार समितीच्या व्यवस्थापनाने काटेकोर प्रयत्न सुरू केले आहेत. 

दुचाकीस्वारांना बाजार समितीच्या बाहेर वाहने लावण्याची सक्ती करण्यात येत आहे. जेणेकरून अनावश्‍यक गर्दी टाळण्यास मदत होणार आहे. सोमवारी बाजार समितीने नियम कडक केले. त्यामुळे बाजार समितीत झालेल्या सौद्यास फारसा गोंधळ झाला नाही. गेल्या चार दिवसांपासून भाजीपाला व फळांच्या आवकेत चांगलीच वाढ झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी...सोलापूर  : मराठा समाजाला आरक्षण...
मुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम...नाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त...
सोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
सोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत...
जळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची...जळगाव : शासकीय उदीद, मूग खरेदीसंबंधीची प्राथमिक...
परभणीत भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ची पिकांसह...परभणी : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान...
नाशिक जिल्ह्यात खरिपासह भाजीपाला पिके...नाशिक : जिल्ह्याच्या सर्वदूर भागात शनिवारी (...
`औरंगाबाद जिल्ह्यातील नुकासानग्रस्त...औरंगाबाद : सतत सुरू असलेल्या पावसाने कोणत्या...
ऊसतोडणी दर ठरविताना उत्पादकांवरील बोजा...पुणे : दहा लाख ऊसतोडणी कामगारांच्या वतीने विविध...
मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवावीमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च...
‘मुळा’तून विसर्ग बारा हजार क्युसेकवर...नगर ः नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस...
शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या...कोल्हापूर : पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही...
मोताळा तालुक्यात वादळी पावसाने नुकसानबुलडाणा ः जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) वादळी...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक कमीच; दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपूर जिल्ह्यात पुराचा २९ हजार...नागपूर : पुरामुळे जिल्ह्यात २९ हजार २६२...
सोलापुरात पितृपंधरवड्यामुळे गवार,...सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न...
डाळिंब फळपिकातील तेलकट डाग व्यवस्थापनसोलापूर, सांगली, नाशिक आणि नगर यासारख्या...
औरंगाबादमध्ये मूग, उडीद, ज्वारी,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...