Agriculture news in marathi To regular indebted farmers Sanugrah grant to be received: Nana Patole | Page 2 ||| Agrowon

नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार सानुग्रह अनुदान : नाना पटोले 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 जुलै 2021

शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच ५० हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. 

गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात ५० हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. 

पत्रकार परिषदेत नाना पटोले म्हणाले, ‘‘थकीत कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांचे कर्जमाफी करण्यासाठी महाविकास आघाडीने पुढाकार घेतला होता. त्या सोबतच कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये याची देखील खबरदारी घेण्यात आली. अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याकरता सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती. हा निधी देण्यास अनेक कारणांमुळे विलंब झाला, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण होत होता. आता लवकरच सानुग्रह अनुदान म्हणून ५० हजार रुपये कर्जदार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतील. सरकारने धान उत्पादकांना सातशे रुपये बोनस देण्याची घोषणा केली होती. यातील अर्धी रक्कम धान उत्पादकांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. उर्वरित रक्कम देखील लवकरच जमा होईल.’’ 

ओबीसींवर केंद्राचा राग 
ओबीसीच्या आरक्षणावरून देखील नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर या वेळी ताशेरे ओढले. ओबीसींवर केंद्र सरकारचा राग आहे. केंद्र सरकारमुळेच ओबीसी आरक्षण रद्द झाले आहे. ओबीसींच्या जनगणना संदर्भात केंद्राने राज्यसभेत ओबीसींची जनगणना करणार नाही आणि ओबीसींची आकडेवारी देणार नाही, असे सांगितल्यामुळे भाजप सरकार ओबीसींच्या किती विरोधात आहे हे स्पष्ट होते. 

नुकसानग्रस्तांना मिळणार मदत 
अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या लोकांना मदत करण्यापेक्षा राजकारण करणाऱ्या लोकांनी जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. राज्य सरकारने पीक नुकसान व सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. त्या आधारे शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे. त्या बाबतचा निर्णयही लवकरच घेतला जाईल. कोरोनाच्या संकटामुळे व्यापाऱ्यांची प्रतिष्ठाने दुपारी चार वाजेपर्यंत खुली असतात. महामारीच्या प्रकोपामुळे केंद्राने दिलेल्या निर्देशानुसार दिशानिर्देश लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात तिसरी लाट येणार असल्याची शक्यता असल्याने या परिस्थितीला हाताळण्यासाठी दुपारी चार वाजेनंतर लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. 


इतर ताज्या घडामोडी
केंद्र्याच्या कृषी कायद्यांविरोधातील २७...कोल्हापूर : शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यावेत,...
देवसंस्थांच्या जमिनीवर वहिवाटदारांचा...जेजुरी, जि. पुणे : देवसंस्थानच्या मालकीच्या...
पुरस्कारांच्या प्रस्तावावरून कृषी...अकोला : विविध पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांनी दाखल...
कोयना धरणात १०१ टीएमसीवर पाणीसाठाकोयनानगर, जि. सातारा : शंभर दिवस ओलांडलेल्या...
उजनी धरणात उपयुक्त साठा ६४ टक्केच;...सोलापूर : उजनी धऱणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही...
अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा...अकोला ः जिल्ह्यात अतिपावसाने धुमाकूळ घातला असून...
राज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...
वाशीम झेडपी निवडणुकीचा चेंडू पुन्हा...वाशीम : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिक्त...
‘एफआरपी’च्या तुकड्यांनी शेतकरी...कऱ्हाड, जि. सातारा : एकरकमी ‘एफआरपी’चे तीन तुकडे...
हिंगोलीत मुहूर्ताच्या सोयाबीनला ११ हजार...हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
पीक नुकसान नोंदीसाठी विमा कंपन्यांच्या...परभणी : ७२ तासांच्या आत पीक नुकसानीची नोंद...
राज्यसभेच्या एका जागेसाठी ४ ऑक्टोबरला...नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त...
गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज; तीन...सिंधुदुर्गनगरी : घरोघरी गणेशोत्सव साजरा करण्याची...
ई-पीक पाहणीसाठी सोलापुरचे जिल्हाधिकारी...सोलापूर ः माढा तालुक्यात सुरू असलेल्या ई-पीक...
परभणी जिल्ह्यात १२७ गावे बाधितपरभणी ः जिल्ह्यात सोमवार (ता. ६) ते मंगळवार (ता....
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूभुसावळ, जि. जळगाव : तालुक्यातील हतनूर धरणात...
संगणकीय सातबारावर कुळांची नावे नोंद करागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : हस्तलिखित सातबारा...
पावसाचा २७ हजार हेक्टरला फटकानाशिक : नांदगाव तालुक्यातील झालेल्या...
सहा हजार क्विंटल धान्याचे होणार कंपोस्ट...भंडारा : वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या...
शेतकरी पुरस्कारासाठी दाखल केलेले...अकोला : शेतीत विविध प्रयोग करणाऱ्या, उत्पादन...