agriculture news in marathi Regular loan repayment in Satara district | Agrowon

सातारा जिल्ह्यात नियमीत कर्ज फेडणारे शेतकरी वाऱ्यावर

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

कऱ्हाड, जि. सातारा ः सरकारने जाहीर केलेली प्रोत्साहनपर रक्कम कागदावरच राहिली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.

कऱ्हाड, जि. सातारा ः सरकारने पीककर्जाची नियमीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्याला तीन महिन्यांहून अधिक काळ झाला. मात्र शेतकऱ्यांना त्यातील दमडीही मिळालेली नाही. त्यातून जिल्ह्यातील दोन लाख ५० हजार शेतकऱ्यांना सुमारे ६०० कोटी रुपये मिळणार होते. मात्र, सरकारने जाहीर केलेली प्रोत्साहनपर रक्कम कागदावरच राहिली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.

सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्यात येईल, अशी घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसने केली होती. निवडणुकीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. त्यामुळे संबंधित सरकारमधील दोन्ही कॉंग्रेसला कर्जमाफी करणे प्रतिष्ठेचे बनले होते. त्यातून  सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. त्याचबरोबर जे शेतकरी नियमित कर्ज भरतात, त्यांच्यावर अन्याय नको म्हणून त्या शेतकऱ्यांनाही ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली होती. 

दरम्यान, नियमीत कर्जदार शेतकरी या निर्णयामुळे आनंदात होते. मात्र, त्या घोषणेला तीन महिन्यांचा कालावधी झाला. तरीही शेतकऱ्यांना त्या ५० हजारातील दमडीही मिळालेली नाही. ५० हजाराच्या वर ज्यांची रक्कम आहे, त्यांना ५० हजार रुपये बॅंक खात्यावर रक्कम जमा होतील. ज्यांनी ५० हजारांपेक्षा कमी कर्ज घेतले आहे, त्यांना त्यांच्या कर्जाच्या रकमेएवढी रक्कम त्यांच्या खात्यावर शासनाकडून जमा करण्यात येईल. 


इतर ताज्या घडामोडी
शहरातील आठवडे बाजारांवर महापालिका...पुणे ः शेतकऱ्यांच्या शेतमालाला मध्यस्थाशिवाय थेट...
अखाद्य वस्तूंमुळे जनावरांना होणारे अपाय जनावरांना होणारे सर्वसामान्य संसर्गजन्य आजार हे...
परभणी जिल्ह्यात कृषी, पशुसंवर्धनासाठी...परभणी ः ‘‘परभणी जिल्हा परिषदेच्या यंदाच्या...
काबुली हरभऱ्याचा दर आठ हजार रुपयांवरजळगाव  ः  खानदेशात काबुली हरभऱ्याची आवक...
‘रोटेशनप्रमाणे धरणाच्या पाण्याचे वाटप...सातारा :  ‘‘या वर्षी चांगला पाऊस पडला....
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ...अकोला : इतर मागासप्रवर्गासाठी (ओबीसी) असलेल्या २७...
‘भरड धान्य खरेदी केंद्रांसाठी तातडीने...जळगाव  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात फक्त मका...
तापमानात वाढ होण्यास सुरुवातमार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्रावरील...
तेलकट डाग रोग व्यवस्थापनाच्या सहा...तेलकट डाग रोग (बॅक्टेरियल ब्लाइट किंवा बीबीडी)...
‘जलयुक्त’च्या कामाची धारवाडी, चिचोंडीत...नगर : जलयुक्त शिवार अभियानातील तक्रारी असलेल्या...
अकोला जिल्हा परिषदेत ओबीसी सदस्यांवर...अकोला : इतर मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) असलेल्या...
उत्तर सोलापुरात २३ गावांचे होणार...सोलापूर : ‘‘गावठाणातील जमिनींचे ड्रोनद्वारे...
सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना...औरंगाबाद : ‘‘असंघटित क्षेत्रातील सूक्ष्म अन्न...
खानदेशात जलसाठा मुबलक जळगाव : खानदेशात विविध प्रमुख सिंचन...
हरभरा दर सुधारल्याने नांदेडचे शेतकरी...नांदेड : ‘‘केंद्र शासनाच्या किमान हमी दरानुसार...
परभणी जिल्ह्यात तुती लागवडीसाठी ५८५...परभणी ः ‘‘महारेशीम अभियानांतर्गत रेशीम शेती...
साताऱ्यात ४३१ कुटुंबांच्या घराचे स्वप्न...कऱ्हाड : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी १००...
सामूहिक गट शेतीतील ऊस तोडणीस सुरुवात नाशिक : सटाणा तालुक्यातील शेवरे येथील द्वारकाधीस...
परभणी जिल्ह्यातील हरभऱ्याचा पीकविमा...परभणी ः लिमला (ता. पूर्णा) तसेच परिसरात यंदा...
ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी शासनाची...मुंबई : राज्यातील धुळे, नंदुरबार, नागपूर, अकोला,...