परभणी ः ‘‘परभणी जिल्हा परिषदेच्या यंदाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात कृषी तसेच पशुसंवर्धन
ताज्या घडामोडी
नियमित कांदा निर्यात सुरू राहण्यासाठी पाठपुरावा करा
नाशिक जिल्ह्यात कांदा महत्त्वाचे पीक आहे. परिणामी कांद्याची निर्यात नियमित सुरू राहण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा, या आशयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले.
नाशिक : जिल्ह्यात कांदा महत्त्वाचे पीक आहे. मात्र बाजार भावाबाबत अडचणी येतात. दराबाबत अस्थिरता असते. मागणी वाढून बाजार भाव वाढले की, निर्यातबंदीचे धोरण राबविले जाते. परिणामी कांद्याची निर्यात नियमित सुरू राहण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा, या आशयाचे निवेदन कळवण-सुरगाणाचे आमदार नितीन पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले.
मुंबई येथेवर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून पवार यांनी निवेदन सादर केले. मतदारसंघातील पाणी, रस्ते, सिंचन, पर्यटन, वन, आरोग्य, वीज सुविधांसाठी भरघोस निधी देऊन विकासाचा अनुशेष भरून काढावा, अशी विनंती यावेळी केली. या वेळी निफाडचे आमदार दिलीप बनकर उपस्थित होते.
सुरगाणा तालुक्यात वळण योजना राबविताना पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी अडविण्यात यावे. तालुक्यातील लघु पाटबंधारे तलाव, सिमेंट बंधारे व धरणांचे कामे मार्गी लावावी. कळवण व सुरगाणा तालुक्यातील वनपट्टेधारकांना स्वतंत्र सातबारा उतारा द्यावा. तसेच पश्चिम घाट परिसंवेदनशीलमधून वगळावा यासह मूलभूत प्रश्नासंदर्भात लेखी निवेदन पवार यांनी दिले. पारंपरिक वननिवासींच्या अडीअडचणींची सोडवणूक करा. यासह पाणी, रस्ते, शिक्षण, सिंचन, पर्यटन विकासासाठी भरघोस निधी देऊन विकासाचा अनुशेष भरून काढा, अशी मागणीही या वेळी केली.
मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागण्या
- हतगड, चणकापूर व अर्जुनसागर (पुनद) प्रकल्प भागात पर्यटन विकासाला चालना देऊन सापुताराच्या धर्तीवर विकास करा
- सप्तशृंगीगड ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र विकास कामासाठी निधीची तरतूद करावी
- कळवण येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व औद्योगिक वसाहत स्थापन करावी
- 1 of 1064
- ››