agriculture news in Marathi reimbursement order to Mahabeez Maharashtra | Page 2 ||| Agrowon

अमरावती : निकृष्ट बियाणेप्रकरणी भरपाईचे आदेश 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 3 ऑगस्ट 2021

निकृष्ट बियाण्यासंदर्भाने तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीने अहवाल दिल्यानंतरही भरपाईस नकार देणाऱ्या ‘महाबीज’ला अमरावती ग्राहक तक्रार निवारण मंचाने चपराक दिली.

अमरावती ः निकृष्ट बियाण्यासंदर्भाने तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीने अहवाल दिल्यानंतरही भरपाईस नकार देणाऱ्या ‘महाबीज’ला अमरावती ग्राहक तक्रार निवारण मंचाने चपराक दिली. सोयाबीनच्या निकृष्ट बियाण्याकरीता ६१ हजार रुपये व त्यावर तक्रार दाखल तारखेपासून १० टक्के व्याज तसेच १५ हजार रुपये शारीरीक व मानसिक त्रासाकरीता व १० हजार रुपये तक्रारीचा खर्च म्हणून महाबीज व बियाणे विक्रेता बोंडे ॲग्रो सर्व्हिसेस यांना देण्याचे आदेशित केले आहे. 

अमरावती जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष सुदाम देशमुख व सदस्या श्रीमती शुभांगी कोंडे यांनी तक्रारकर्ता विनोद ठाकरे यांना ही भरपाई देण्याचे आदेश दिले. 
अंजनगावसूर्जी येथील तक्रारकर्ता विनोद ठाकरे यांनी आपल्या शेतात पेरण्याकरीता बोंडे ॲग्रो सर्व्हिसेस यांच्याकडून महाबीज व्दारा उत्पादित सोयाबीनचे बियाणे विकत घेतले होते. या बियाणाची पेरणी ठाकरे यांनी शेतामध्ये केली. पण उगवणशक्‍ती कमी असल्याने रोप बहुतांशी उगवलीच नाही. त्यामुळे शेतकरी ठाकरे यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे सोयाबीन बियाणाच्या उगवणशक्ती विषयक तक्रार दाखल केली.

तत्कालीन कृषी अधिकारी यांनी शासनाच्या दिशानिर्देशाप्रमाणे समिती स्थापन करून तक्रारकर्त्याच्या शेताची पाहणी करून पंचनामा केला. कृषी अधिकारी यांच्या समितीमध्ये कृषीतज्ज्ञ यांचा देखील समावेश असल्याने पंचनाम्यामध्ये महाबीज व्दारानिर्मीत सोयाबीन बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. 

तक्रारकर्त्यांचे वकील ॲड.डॉ. रविंद्र मराठे यांनी केलेला युक्तिवाद मान्य करून अमरावती जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष सुदाम देशमुख व सदस्या श्रीमती शुभांगी कोंडे यांनी शेतकरी विनोद ठाकरे यांना महाबीज व बोंडे ॲग्रो सर्व्हिसेस यांनी निकृष्ट दर्जाचे सोयाबीनचे बियाणे विकल्याबद्दल पिकाची नुकसान भरपाई रक्कम ६१हजार रुपये त्यावर तक्रार दाखल तारखेपासून १० टक्के व्याज तसेच १५ हजार रुपये रुपये शारीरीक व मानसिक त्रासाकरीता व १० हजार रुपये तक्रारीचा खर्च म्हणून देण्याचे आदेशित केले आहे. 

तक्रारकर्त्यांचा युक्तिवाद केला मान्य 
शेतकरी ठाकरे यांनी महाबीजला कायदेशीर सूचना देऊन नुकसान भरपाईची मागणी केली. पण महाबीजने कायदेशीर सूचनेला उत्तर देऊन शेतकऱ्याचा दावा नाकारला. त्यामुळे त्यांनी ॲड. डॉ. रवींद्र उल्हास मराठे यांच्यामार्फत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अमरावती यांच्याकडे बोंडे ॲग्रो सर्व्हिस व महाबीज यांच्याविरूद्ध तक्रार दाखल केली. महाबीजतर्फे ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये आपला लेखी जबाब दाखल करुन शेतकऱ्याचा दावा नाकारण्यात आला. तक्रारकर्त्यातर्फे ॲड. डॉ. रविंद्र मराठे यांनी युक्तिवाद करून महाबीजने उत्पादित केल्यामुळे तसेच बोंडे ॲग्रो सर्व्हिसेस यांनी तक्रारकर्त्याला निकृष्ट दर्जाचे सोयाबीनचे बियाणे विकून अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्याचा युक्तिवाद केला. तक्रारकर्त्यांच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राहक मंचाने मान्य केला. 


इतर बातम्या
दहा जिल्ह्यांत ‘कृषी तंत्रज्ञान पारायण’नगर ः फळबागा, शेतीपिके आणि पशुसंवर्धनाबाबत ऐनवेळी...
नगर :‘तहसील’मध्ये सोयाबीन ओतून  किसान...नगर : शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात आल्यानतर...
किनवट, हदगाव, माहूरमध्ये पुन्हा पाऊसनांदेड : जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून पाऊस...
रब्बीत पंधरा हजार हेक्टरवर  करडई...अकोला : तेलवाण वर्गीय पिकांचे उत्पादन...
नाशिक : शेतकऱ्यांचे संपूर्ण वीजबिल माफ...नाशिक : जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने...
सोयाबीनचे दर दबावाखाली;  ‘स्वाभिमीनी’चे...परभणी : सोयाबीनचे दर कोसळविणाऱ्या राज्य व केंद्र...
ऊसबिले दिल्याशिवाय  गाळप परवाना नको :...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे...
‘नासाका’ सुरू होण्याची प्रक्रिया पुढे...नाशिक रस्ता : नाशिक सहकारी साखर कारखाना सुरू...
अकोला :सोयाबीन, कापूस उत्पादक  सततच्या...अकोला : सोयाबीन काढणीला तयार होत असतानाच पावसाची...
कुसुम सौरऊर्जा प्रकल्पातून शेतकऱ्यांना...नाशिक : ‘नापीक आणि अकृषिक जमिनीचा वापर करून...
इंधवे येथील पाझर तलावाची दुरुस्ती होईनापारोळा, जि. जळगाव : इंधवे (ता. पारोळा) येथील पाझर...
पांगरी परिसरात मुसळधारेचा सोयाबीन... पांगरी, ता. बार्शी ः पांगरी भागात...
सौरऊर्जा पंप योजनेचे संकेतस्थळ डाउनऔरंगाबाद : सौरऊर्जेद्वारे कृषिपंप...
मराठवाड्यात पाऊस सुरूच; सोयाबीन, कपाशी...औरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा कमी अधिक प्रमाणात...
तंत्रज्ञान प्रसारामध्ये ‘केव्हीके’चा...सोलापूर ः ‘‘तंत्रज्ञान प्रसारामध्ये सोलापूर कृषी...
बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
बांगलादेशला रेल्वेद्वारे होणार संत्रा...नागपूर : किसान रेल्वेच्या माध्यमातून संत्रा...
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...