नांदेड जिल्ह्यातील पीक विमाधारकांना ६४ कोटींचा परतावा

नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर व सततचा पाऊस, यामुळे नुकसान झाले. त्याचे वैयक्तिक दावे दाखल केलेल्या ७३ हजारपैकी ६७ हजार ६२२ शेतकऱ्यांना ६४ कोटींचा विमा परतावा मिळणे सुरु झाले आहे.
 Reimbursement of Rs. 64 crore to crop insured in Nanded district
Reimbursement of Rs. 64 crore to crop insured in Nanded district

नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर व सततचा पाऊस, यामुळे नुकसान झाले. त्याचे वैयक्तिक दावे दाखल केलेल्या ७३ हजारपैकी ६७ हजार ६२२ शेतकऱ्यांना ६४ कोटींचा विमा परतावा मिळणे सुरु झाले आहे, अशी माहिती इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीच्या प्रतिनिधीकडून मिळाली. दिवाळीत नुकसानग्रस्तांना परतावे मिळाल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाली होती. ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले. विमा कंपनीकडून ७२ तासांच्या आत नुकसानीबाबत ‘क्रॉप इन्शुरन्स ॲप’, इमेल तसेच टोल फ्री क्रमांकांच्या माध्यमातून वैयक्तिक दावे दाखल करण्याचे आवाहन केले होते.

यानुसार जिल्ह्यातील ६३ हजार शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्याचे दावे दाखल केले होते. तर, दहा हजार शेतकऱ्यांनी काढणी पश्चात पिकांचे पावसामुळे नुकसान झाल्याचे कंपनीला कळविले होते. एकूण ७३ हजार दावे दाखल झाल्यानंतर कंपनीकडून पंचनामे करण्यात आले.  

दरम्यान, कंपनीस्तरावर काम पूर्ण करून गुरुवारपासून (ता. १२) ६७ हजार ६२२ विमाधारकांच्या खात्यांवर ६४ कोटी रुपये जमा करण्याचे काम सुरु आहे. विमा जमा झाल्याचे संदेश अनेकांना प्राप्त झाल्यानंतर याबाबत माहिती मिळाली. उर्वरित दहा हजार शेतकऱ्यांना पुढील काही दिवसांत पैसे मिळतील.

यंदा विम्याचे पैसे देणारी पहिली कंपनी राज्यात पीकविमा संकलित करणाऱ्या सहा कंपन्या आहेत. यापैकी इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स ही लवकर कार्यवाही करून शेतकऱ्यांच्या खात्यांवर पैसे जमा  करणारी पहिली कंपनी ठरली आहे, अशी माहिती कंपनीचे प्रतिनिधी गौतम कदम यांनी दिली.

पीक नुकसानीबाबत वैयक्तिक दावे दाखल केलेल्या ७३ हजार शेतकऱ्यांपैकी ६७ हजार ६२२ विमाधारकांच्या खात्यावर ६४ कोटी रुपये जमा करण्याचे काम सुरु आहे. उर्वरित दहा हजार शेतकऱ्यांनाही लवकर पैसे मिळतील. - गौतम कदम, जिल्हा समन्वयक, इफ्को टोकियो विमा कंपनी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com