पालखेडच्या आवर्तनास जिल्हाधिकाऱ्यांचा नकार

पालखेडच्या आवर्तनास जिल्हाधिकाऱ्यांचा नकार
पालखेडच्या आवर्तनास जिल्हाधिकाऱ्यांचा नकार

येवला, जि. नाशिक : पालखेड डाव्या कालव्यावरील पाणी वापर सोसायटीच्या पाण्याने गावालगतचे बंधारे भरून द्यावे, अशी मागणी येवला तालुक्यातील नागडे ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. परंतु, मार्चमध्ये पाण्याचे आवर्तन सोडण्याचे नियोजन आहे. त्यामुळे आता कॅनॉलने पाणी देता येणार नाही, असे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी स्पष्ट केले. परिणामी सध्या उपलब्ध होणाऱ्या पाण्यावरच नागडेवासीयांना तहान भागवावी लागणार आहे.

पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने एप्रिलऐवजी आताच पाण्याचे रोटेशन सोडा, अशी मागणी नागडे ग्रामस्थांनी केली. त्यासाठी तहसीलदार कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. सोमवारी (ता. १७) दुपारी एकच्या सुमारास ग्रामस्थांसह गारदेबाबा पाणी वापर सहकारी संस्थेशी संबंधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने वणवण करावी लागत असल्याची कैफियत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडली.

टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ते पाणी पुरेसे नाही. बंधारे भरून देण्यासाठी पालखेड धरणातून २०० दलघफूट इतके पाणी कॅनॉलद्वारे सोडावे, अशी मागणी ३९ वितरिकांचा समूह असलेल्या गारदेबाबा पाणी वापर सहकारी संस्थेतर्फे करण्यात आली. त्यास जिल्हाधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शविली. २०१५ मध्ये दुष्काळी परिस्थितीत एक थेंब पाण्याचे आरक्षण नसतानाही प्रशासनाने मदत केल्याची आठवण या ग्रामस्थांना करून देण्यात आली.

मार्चमध्ये पाणी कसे देणार? आता बंधाऱ्यात पाणी दिल्यास मार्चमध्ये पुन्हा कोठून पाणी देऊ, असा सवालही उपस्थित करण्यात आला. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अन्य मार्गांनी सोडवू, अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी नागडेवासीयांनी दिली. त्यामुळे ग्रामस्थ माघारी परतले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com