Agriculture news in Marathi relation of ministers with insurance companies | Page 3 ||| Agrowon

विमा कंपन्यांशी मंत्र्यांचे साटेलोटे ः तुपकर

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 3 जून 2021

 relation of ministers with insurance companies
पीकविमा कंपन्यांच्या विरोधात यापूर्वी अनेक वेळा आंदोलने झाली. शेतकरी रस्त्यांवर उतरले, तरीही सरकारने पीकविमा कंपन्यांवर आजतागायत कारवाई केली नाही. कारण सरकार आणि पीकविमा कंपन्यांचं साटेलोटं आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे. 
 

नागपूर : पीकविमा कंपन्यांच्या विरोधात यापूर्वी अनेक वेळा आंदोलने झाली. शेतकरी रस्त्यांवर उतरले, तरीही सरकारने पीकविमा कंपन्यांवर आजतागायत कारवाई केली नाही. कारण सरकार आणि पीकविमा कंपन्यांचं साटेलोटं आहे. सरकारमधल्या अनेक मंत्र्यांचे पीकविमा कंपन्यांशी लागेबांधे आहेत. आता पीकविमा कंपन्यांचा काटा सरकारने काढायला हवा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. 

तुपकर म्हणाले की, आतापर्यंत केंद्र सरकार, राज्य सरकार आणि शेतकरी असा सर्वांचा हिस्सा प्रिमियमसाठी भरला जातो. सर्वांची मिळून ही ५ हजार ८०० कोटी रुपयांची रक्कम विमा कंपन्यांना मिळाली आहे. पण नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना आतापर्यंत फक्त १ हजार कोटी रुपयेच मिळाले आहेत. तर पीकविमा कंपन्यांचा फायदा ४ हजार ८०० कोटी रुपयांचा झालेला आहे. सरकारमधल्या अनेक मंत्र्यांचे या पीकविमा कंपन्यांशी लागेबांधे आहेत. त्यामुळे कंपन्यांवर कारवाई होत नाही. फक्त ओरड केली जाते. काही शेतकरी, आंदोलक रस्त्यांवर उतरले, की घोषणा तेवढ्या केल्या जातात. पण प्रत्यक्षात कारवाई मात्र केली जात नाही. 

‘मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर’, अशा पद्धतीने वर्षानुवर्षे पीकविमा कंपन्या सरकारला हाताशी धरून कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारत आहे. ही सरळ सरळ शेतकऱ्यांची लूट आहे. यावर उपाय म्हणून राज्य सरकार, केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांचा हिस्सा मिळून जवळपास हेक्टरी १४ हजार ते १५ हजार रुपये प्रीमियम भरला जातो. हा प्रीमियम न भरता, पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १५ हजार रुपयांची मदत, अशी किमान दोन हेक्टरसाठी केली पाहिजे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांनीही मिळून ही मदत केली पाहिजे, अशीही मागणी तुपकर यांनी केली आहे. दोन्ही सरकारने मिळून जर हा निर्णय घेतला, तर शेतकऱ्यांना मोठा आधार मिळू शकतो आणि विमा कंपन्यांचा काटा नेहमीसाठी दूर होऊ शकतो. पण यासाठी गरज आहे इच्छाशक्तीची.. 

‘प्रसंगी रस्त्यावर उतरू’
आता स्वाभिमानी शेतकरी संघटना या मागणीसाठी आग्रही राहणार आहे. प्रसंगी रस्त्यावरही उतरू पण शेतकऱ्यांना विमा कंपन्यांच्या कचाट्यातून बाहेर काढू, असा निश्‍चय तुपकर यांनी व्यक्त केला आहे.


इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये शेवग्याला २००० ते ४५०० रुपये दरनगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक वाढली; दरात घटनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
रत्नागिरीत पूर ओसरला, सावरण्याची धडपड ...रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून पूर...
विदर्भात ६६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे...नागपूर : विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात शनिवारी (ता...
मराठवाड्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७९ लघू, मध्यम, मोठ्या...
स्मार्ट तंत्रज्ञानाने मेंदू बथ्थड होत...आधुनिक तंत्रज्ञानामुळे माणूस बथ्थड, मूर्ख होत...
कोल्हापुरात ६३ हजार हेक्टर पिकांना फटकाकोल्हापूर : जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे सुमारे...
परभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके...परभणी ः अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे परभणी...
केंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण...रायगड/रत्नागिरी : ‘‘तळिये गावात पंतप्रधान आवास...
समृद्धीला समांतर बुलेट ट्रेनचा मार्ग बुलडाणा : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गालगतच आता...
नगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन नगर : नगर जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी आता उरकली आहे...
साताऱ्यात भूस्खलनात आतापर्यंत ३२ जणांचा...सातारा : गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात...
आवक कमी दाखवून बाजार समितीची फसवणूक पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळे,...
नदीकाठावरील ऊस वाहून गेलानेर्ले, जि. सांगली : बहे रामलिंग बेटाच्या...
अकोल्यातील २३३६ कर्जदार सावकारी...अकोला : शासनाने जाहीर केलेल्या परवानाधारक सावकारी...
गोंदिया : पावसाअभावी दीड लाख हेक्‍...गोंदिया :  देशात मॉन्सूनचे आगमन होऊन दोन...
पुण्यात आले, टोमॅटो दरांत सुधारणापुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
वातावरण बदलात पारंपरिक वाण टिकवतील...भारतामधील भूजल साठ्यामध्ये सर्वांत श्रीमंत राज्य...
नुकसानीची सूचना विमा कंपन्यांना द्यावी...सोलापूर : ‘‘यंदा जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण...
उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीनमध्ये शंखी...बेलकुंड, जि. उस्मानाबाद जिल्ह्यात : बेलकुंड (ता....