Agriculture news in Marathi, To relax the conditions in the Horticulture scheme: Sadabhau Khot | Agrowon

फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू ः सदाभाऊ खोत
टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 जून 2019

रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत कोकणातील शेतकऱ्यांना ठिबक सिंचन अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या अडचणींविषयी चर्चा करून ती अट शिथिल करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन कृषी, फलोत्पादन पणन आणि पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले.

नाणीज (ता. रत्नागिरी, जि. रत्नागिरी) येथील दौऱ्याप्रसंगी रत्नागिरी तालुका कृषी आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी कृषी व ग्रामीण पाणीपुरवठा विभागांचा आढावा घेतला. 

रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत कोकणातील शेतकऱ्यांना ठिबक सिंचन अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या अडचणींविषयी चर्चा करून ती अट शिथिल करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन कृषी, फलोत्पादन पणन आणि पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले.

नाणीज (ता. रत्नागिरी, जि. रत्नागिरी) येथील दौऱ्याप्रसंगी रत्नागिरी तालुका कृषी आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी कृषी व ग्रामीण पाणीपुरवठा विभागांचा आढावा घेतला. 

या आढावा बैठकीत भात लागवड व फळबाग लागवडीच्या प्रगतीसंदर्भात सूचना केल्या. भात बियाण्यांच्या उपलब्धतेविषयी आढावा घेऊन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या वाणांचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. रत्नागिरी जिल्ह्यात फळबाग लागवड योजना महत्त्वाची असून, या संदर्भात ग्राम स्तरापर्यंत बैठका घेऊन जास्तीत-जास्त क्षेत्र फळबाग लागवडीखाली आणण्याविषयी मार्गदर्शन केले. कोकणातील शेतकऱ्यांना भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत ठिबक सिंचन अनिवार्य केल्यामुळे येणाऱ्या अडचणी संदर्भात चर्चा करून सदरील अट शिथिल करणेबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.

फळबागेत पाण्याचे नियोजन होण्याच्या दृष्टीने डोंगराळ परिस्थिती पाहून शेततळ्याचा आकार कमी करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच आंबा पुनरुज्जीवनाबाबत वाढती मागणी लक्षात घेऊन अनुदान वाढविण्यात येईल. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानात कमी खर्चाचे शेडनेट अंतर्भूत करण्याचा विचार सुरू आहे. कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी शेतीशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन तंत्रज्ञान प्रचार अणि प्रसाराचे काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. 

कोकणातील मजूर टंचाई लक्षात घेता कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत जेवढे प्रस्ताव येतील तेवढ्या सर्व प्रस्तावांना अनुदान देण्याची तरतूद करू, असेही आश्‍वासन या वेळी दिले. यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत फळबागेच्या फवारणीकरिता पॉवरस्प्रेअर या अवजाराचा समावेश करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 
या बैठकीला विभागीय कृषी सहसंचालक कोकण विभाग विकास पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप यांच्या अन्य अधिकारी उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
उशिरा पेरणीसाठी पीक नियोजन आतापर्यंत पडलेला पाऊस व पुढे येणारा पाऊस याचा...
परभणी जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार लवकरच...सोलापूर : कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक विद्यमान...
पीकविमा प्रश्‍न आठ दिवसांत सोडवा : `...सोलापूर : शेतकऱ्यांनी विमा काढावा, यासाठी...
विमा कंपन्यांविरोधात किसान सभेचा तीन...औरंगाबाद : पंतप्रधान पीकविमा योजनेतील सदोष तरतुदी...
बागलाणात खरीप हंगामातील पिके धोक्यात नाशिक : या वर्षी बागलाण तालुक्यातील रोहिणी, मृग व...