agriculture news in marathi Relaxation if power outage | Agrowon

वीजजोड तोडल्यास आसूडाचा प्रहार

टीम अॅग्रोवन
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

कऱ्हाड,  जि.  सातारा : लॉकडाउन काळातील घरगुती वीजबिले माफ करा, अन्यथा वीज कनेक्‍शन तोडणी करण्यास येणाऱ्या कर्मचाऱ्यास आसूडाचे प्रहार करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

कऱ्हाड,  जि.  सातारा : लॉकडाउन काळातील घरगुती वीजबिले माफ करा, अन्यथा वीज कनेक्‍शन तोडणी करण्यास येणाऱ्या कर्मचाऱ्यास बळिराजा शेतकरी संघटना आणि प्रहार जनशक्ती पक्षाकडून आसूडाचे प्रहार करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना देण्यात आले.

निवेदनानुसार, कोरोनामुळे शेती उत्पादित मालाचे नुकसान झाले. शेतीमाल अक्षरश: रस्त्यावर फेकून द्यायची वेळ शेतकऱ्यांवर आली. कंपन्या, उद्योगधंदे बंद असल्यामुळे सर्वसामान्य लोकांना रोजगार मिळाला नाही. माणसांना दोन वेळच्या जेवणाचे वांदे झाले असतानाच महावितरणने अंदाजे वीजबिले वाढवून ग्राहकांना दिली. त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडेच मोडले. एकीकडे हाताला काम नाही व दुसरीकडे महावितरणने वाढवून वीजबिले देऊन सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउन काळातील घरगुती वीजबिले सरसकट माफ करावीत. ऊर्जामंत्री नितीन राऊत अगोदर वीजबिले माफ करणार, असे म्हणतात. आता वीजबिले माफ करणार नाही, असे म्हणतात. यामुळे सरकारविरोधात सर्वसामान्य लोकांमध्ये असंतोष आहे.

सरकारने याचा गांभीर्याने विचार करून लॉकडाउन काळातील घरगुती वीजबिले माफ करावीत, अन्यथा, थकीत घरगुती वीज कनेक्‍शन तोडणी करायला येणाऱ्या कर्मचाऱ्यास आसूडाचे फटके देणार. याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील. यापुढील आंदोलन तीव्र स्वरूपाचे असेल, असे निवेदनात नमूद आहे. 

बळिराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजित बानुगडे, घराळ बापू, मनोज माळी, प्रहार संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
 


इतर ताज्या घडामोडी
रिसोडमध्ये कांदा बीजोत्पादनाकडे कल रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात यंदा कांदा...
औरंगाबादेत सर्वच पक्षांकडून गुलालाची...औरंगाबाद : मतदानाची प्रक्रिया शांततेत पार...
पुणे जिल्ह्यात संमिश्र निकाल; दावे-...पुणे ः जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये...
साताऱ्यात स्थानिक आघाड्यांचा जल्लोषसातारा ः दोन दिवसांपूर्वी मतदान झाले. गेले दोन...
नांदेड जिल्ह्यात प्रस्थापितांनी सत्ता...नांदेड : नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे...
नाशिक जिल्ह्यात प्रस्थापितांना धक्कानाशिक : जिल्ह्यात एकूण ६२१ ग्रामपंचायतीच्या...
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या...यवतमाळ : माजी मुख्यमंत्री व जलक्रांतीचे प्रणेते...
परभणी जिल्ह्यात संमिश्र यशपरभणी ः परभणी जिल्ह्यातील मतदान झालेल्या ४९८...
भाजपचे ४४, शिवसेनेचे २२ ग्रामपंचायतीवर...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतीपैकी...
नागपुरात संत्रा दरात तेजीनागपूर ः आंबिया बहाराचा हंगाम अंतिम टप्प्यात...
सांगलीत भाजपला धक्का;  महाविकास आघाडीला...सांगली : ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालात...
रत्नागिरीत शिवसेनेला कौल रत्नागिरी : जिल्ह्यातील ३६० ग्रामपंचायतींचे निकाल...
सोलापुरात प्रस्थापितांना धक्कासोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ५९०...
उमरेड येथील महिलांनी स्थापन केली शेतकरी...उमरेड. जि. नागपूर : शेतीमधील विषम परिस्थितीची दखल...
स्वाभिमानीचा विजयासाठी संघर्षकोल्हापूर : कोण म्हणतंय येत नाही, आल्याशिवाय राहत...
‘ब्लॅक राइस’ बियाणे निर्मितीचे काम सुरुरत्नागिरी ः तालुक्यातील शिरगाव येथील कृषी संशोधन...
सोलापुरात वांगी, गाजराला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
विदर्भात महाविकास आघाडी, भाजपला संमिश्र...नागपूर : विदर्भात महाविकास आघाडी, भाजप प्रणीत...
वऱ्हाडात महाविकास आघाडीला यश अकोला : ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या...
जळगाव जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव...जळगाव : परभणी जिल्ह्यात आढळून आलेल्या ‘बर्ड फ्लू’...