मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, केंद्र सरकारचे तीन नव्या कृषी कायद्यांना विरो
बातम्या
वीजजोड तोडल्यास आसूडाचा प्रहार
कऱ्हाड, जि. सातारा : लॉकडाउन काळातील घरगुती वीजबिले माफ करा, अन्यथा वीज कनेक्शन तोडणी करण्यास येणाऱ्या कर्मचाऱ्यास आसूडाचे प्रहार करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
कऱ्हाड, जि. सातारा : लॉकडाउन काळातील घरगुती वीजबिले माफ करा, अन्यथा वीज कनेक्शन तोडणी करण्यास येणाऱ्या कर्मचाऱ्यास बळिराजा शेतकरी संघटना आणि प्रहार जनशक्ती पक्षाकडून आसूडाचे प्रहार करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना देण्यात आले.
निवेदनानुसार, कोरोनामुळे शेती उत्पादित मालाचे नुकसान झाले. शेतीमाल अक्षरश: रस्त्यावर फेकून द्यायची वेळ शेतकऱ्यांवर आली. कंपन्या, उद्योगधंदे बंद असल्यामुळे सर्वसामान्य लोकांना रोजगार मिळाला नाही. माणसांना दोन वेळच्या जेवणाचे वांदे झाले असतानाच महावितरणने अंदाजे वीजबिले वाढवून ग्राहकांना दिली. त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडेच मोडले. एकीकडे हाताला काम नाही व दुसरीकडे महावितरणने वाढवून वीजबिले देऊन सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउन काळातील घरगुती वीजबिले सरसकट माफ करावीत. ऊर्जामंत्री नितीन राऊत अगोदर वीजबिले माफ करणार, असे म्हणतात. आता वीजबिले माफ करणार नाही, असे म्हणतात. यामुळे सरकारविरोधात सर्वसामान्य लोकांमध्ये असंतोष आहे.
सरकारने याचा गांभीर्याने विचार करून लॉकडाउन काळातील घरगुती वीजबिले माफ करावीत, अन्यथा, थकीत घरगुती वीज कनेक्शन तोडणी करायला येणाऱ्या कर्मचाऱ्यास आसूडाचे फटके देणार. याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील. यापुढील आंदोलन तीव्र स्वरूपाचे असेल, असे निवेदनात नमूद आहे.
बळिराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजित बानुगडे, घराळ बापू, मनोज माळी, प्रहार संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
- 1 of 1504
- ››