agriculture news in marathi, Release urdwa penganga water | Agrowon

`उर्ध्व पेनगंगाचे पाणी सोडा`
टीम अॅग्रोवन
रविवार, 26 मे 2019

नांदेड : मालेगाव (ता. अर्धापूर) परिसरातील गावांसाठी पिण्याचे पाणी, जनावरांच्या चारा- पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे उर्ध्व पेनगंगा प्रकल्पाचे पाणी नदी- नाल्यांद्वारे सोडून शेतकरी, ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी ग्रामपंचायतींनी केली आहे. दाभडी नाल्यातून पाणी न सोडल्यास शेतकऱ्यांच्या वतीने मालेगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले, माजी जि. प. अध्यक्ष माणिकराव इंगाेले, शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख नागोराव इंगोले यांनी दिला.

नांदेड : मालेगाव (ता. अर्धापूर) परिसरातील गावांसाठी पिण्याचे पाणी, जनावरांच्या चारा- पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे उर्ध्व पेनगंगा प्रकल्पाचे पाणी नदी- नाल्यांद्वारे सोडून शेतकरी, ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी ग्रामपंचायतींनी केली आहे. दाभडी नाल्यातून पाणी न सोडल्यास शेतकऱ्यांच्या वतीने मालेगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले, माजी जि. प. अध्यक्ष माणिकराव इंगाेले, शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख नागोराव इंगोले यांनी दिला.

थकीत पाणीपट्टीच्या नावाखाली प्रशासन चालढकलपणा करीत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार पाणी सोडावे, ग्रामीण भागात दुष्काळाची मोठी दाहकता आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चारा- पाण्याची टंचाई जाणवत आहे. उर्दू पेनगंगा प्रकल्पातील पाणी नद्या नाल्यांना सोडावे, यासाठी अर्धापूर, नांदेड, मुदखेड तालुक्यांतील अनेक ग्रामपंचायतींनी अशा स्वरूपाचा ठराव घेऊन जिल्हा प्रशासनाला कळवले. 

नद्या, नाल्यांना पाणी आल्यास काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. परंतु, थकीत पाणीपट्टीची कारणे सांगून मालेगाव परिसराला पाणी सोडण्यास प्रशासन टाळाटाळ करीत आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. ग्रामपंचायतींनी पैसे न भरल्यास प्रशासन पाणी सोडणार नसेल, तर रास्ता रोको आंदोलनासह तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रल्हाद इंगोले यांनी दिला.

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...
कर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव  : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....
पुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे  ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...
कुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...
रासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली  : आगामी विधानसभा निवडणुकीत...
मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे  ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...
अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला  ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...
कऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा  : महापुरामुळे...
गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली  ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...
जळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...
तणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
पूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...
संत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...