Agriculture news in marathi release water from ‘Tembhu’ in dry lake in the Kadegaon taluka | Agrowon

‘टेंभू’तील पाण्याने कडेगाव तालुक्यातील तलाव भरावे

टीम अॅग्रोवन
बुधवार, 29 एप्रिल 2020

सांगली : कडेगाव तालुक्यातील करांडेवाडी तलाव व शाळगाव बोंबाळेवाडी तलाव पाण्याअभावी कोरडे आहेत. अन्य तलावांत एकूण २६९ दशलक्ष घनफूट एवढेच पाणी शिल्लक आहे.

सांगली : कडेगाव तालुक्यातील करांडेवाडी तलाव व शाळगाव बोंबाळेवाडी तलाव पाण्याअभावी कोरडे आहेत. अन्य तलावांत एकूण २६९ दशलक्ष घनफूट एवढेच पाणी शिल्लक आहे. त्यामुळे तालुक्यात पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या टेंभू सिंचन योजनेतून तालुक्यातील सर्व तलाव पाण्याने भरून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे

टेंभू उपसा सिंचन योजनेच्या क्षेत्रात कडेगाव तालुक्यातील ९ हजार ४२५ हेक्टर क्षेत्र आहे. सिंचन योजना सुरू होऊन महिना होत आला. टेंभू योजनेच्या मुख्य पंपापासून अवघ्या पंधरा किलोमीटरवर कडेगाव तालुक्यात सात प्रकल्प आहेत.

तालुक्यातील कडेगाव, कडेपूर, नेर्ली,अपशिंगे, कोतवडे आदी गावांच्या पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी आहेत. शेतीला देखील याच तलावातून पाणी मिळते. तेथील पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. उष्णतेमुळे तलावातील पाणी कमी होत आहे. फास प्रकल्पातील साठा पंधरा ते वीस दिवसांत संपुष्टात येण्याची शक्यता आहे. 

सध्या टेंभू योजना सुरू आहे. मुख्य कालव्यातून पाणी दुष्काळी भागाकडे पोहोचले आहे. परंतु, पोट कालव्यातून शेतीसाठी कमी दाबाने पाणी सोडली जात आहे. पोट कालवे आणि मुख्य कालव्यालगत असणारे पाझर तलाव, ओढे, विहिरी भरून द्याव्या, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. 

 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दाणादाणनाशिक : पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी...
पीक कर्जासाठी बँकेत मुक्कामाची वेळ येऊ...बुलडाणा ः खरीप हंगामातील पिकांच्या काढणीची वेळ...
पाथरूड परिसरातील प्रकल्प तुडुंबपाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूडसह परिसरात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील ९० टक्के भातपिकांना...
परभणी, हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पिकांवर...परभणी : खरीप हंगामातील सोयाबीन काढणीच्या, कापूस...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या शेंगांना...हिंगोली : गतवर्षी प्रमाणे यंदाही सोयाबीनचे पीक ऐन...
‘जायकवाडी’तील विसर्गात घटऔरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून...
निम्न दुधनातून ७१९० क्युसेकने विसर्गपरभणी : सेलु तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील दुधना...
अनुदानाअभावी मर्यादित लाभार्थ्यांना...सिंधुदुर्ग ः कोरोनामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या...
ऊसतोडणीच्या तिढ्यावर आज चर्चापुणे : दहा लाख ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत...
यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटले...यवतमाळ : खोडकीड, चक्रीभुंगा त्यानंतर आता परिपक्व...
संत्रा उत्पादकांना हेक्टरी लाखाची भरपाई...नागपूर : विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा,...
पुण्यात विशिष्ट ठिकाणीच लिंबे विक्रीला...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने...
गाय एका आठवड्यात दोनदा व्यायली नाशिक ः येथील डॉ. इरफान खान हे व्यवसायाने डॉक्टर...
हवामान बदलाचे सेंद्रिय कर्बावरील परिणामजागतिक हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ हे शब्द...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...