म्हैसाळ योजनेचे पाणी जत तालुक्यात गतीने सोडा 

सांगली : जत तालुक्यात दुष्काळ, पाणी टंचाई, अवकाळी पाऊस व कोरोनामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. या शेतकऱ्यांनी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पैसे भरले नसले तरी, त्यांच्याकडून नंतर पैसे भरुन घ्या, परंतु मागणी आल्यानंतर गतीने पाणी सोडा, अशी सूचना आमदार विक्रम सावंत यांनी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांना केली.तालुक्यात पाणी टंचाईसंदर्भात म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे अधिकारी, पाणी पुरवठा विभाग अधिकाऱ्यांची बैठक झाली, त्यावेळी श्री. सावंत बोलत होते.
Release the water of Mysaal scheme for Jat Taluka
Release the water of Mysaal scheme for Jat Taluka

सांगली : जत तालुक्यात दुष्काळ, पाणी टंचाई, अवकाळी पाऊस व कोरोनामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. या शेतकऱ्यांनी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पैसे भरले नसले तरी, त्यांच्याकडून नंतर पैसे भरुन घ्या, परंतु मागणी आल्यानंतर गतीने पाणी सोडा, अशी सूचना आमदार विक्रम सावंत यांनी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांना केली. तालुक्यात पाणी टंचाईसंदर्भात म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे अधिकारी, पाणी पुरवठा विभाग अधिकाऱ्यांची बैठक झाली, त्यावेळी श्री. सावंत बोलत होते. 

श्री. सावंत म्हणाले की, जून महिन्यात जत तालुक्यात मॉन्सूनचा पाऊस पडत नाही. ऑगस्ट २०२० अखेरपर्यंत पाणीटंचाई आराखडा तयार करुन त्याचा प्रस्ताव सादर करावा. कालव्यातून पाणी सोडताना शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी, शेतकऱ्यांना पाणी द्यावे. परंतु पर्यायी व्यवस्था करुन पिकांचे नुकसान न करता पाणी देण्यात यावे. 

पाणी पुरवठा योजना सुरू असलेल्या तलावात पाणी सोडण्यासाठी प्राधान्य क्रम द्यावा. मिरवडा परिसरातील शेतकऱ्यांनी दीड वर्षांपूर्वी सुमारे पाच लाख रुपये भरले आहेत. प्रथम प्राधान्य देऊन मिरवाड येथील साठवण तलावात पाणी सोडण्यात यावे. अंकले येथील पंपहाऊचे काम पूर्ण झाले आहे. वीज कनेक्शनची चाचणी घेऊन बिळूर व देवनाळ कालव्यात पाणी सोडावेत. 

पाणी मागणी नोंदवावी  सध्या घोलेश्वर येथे पाणी आलेले आहे. सनमडी व येळवी येथील नागरिकांनी पाण्यासाठी करण्यासाठी पाटबंधारे विभागाकडे मागणी नोंदवावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली. 

म्हैसाळ योजनेच्या कालव्यातून सध्या ३०० क्यूसेक्स पाणी येत आहे. वायफळ, बनाळी, कुंभारी, बागेवाडी, तिप्पेहळ्ळी, बिरनाळ, शेगाव नंबर दोन, अंतराळ, डफळापूर येथील पाणीसाठा झाला आहे. टप्पा क्रमांक ६ अ योजनेचे लिफ्ट सुरू झाल्यानंतर बाज व अंकले येथील तलाव भरणार असल्याचे म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com