Agriculture news in marathi Released the water of the Tembhu scheme; Testing of 'closed pipe' begins | Agrowon

टेंभू योजनेचे पाणी सोडले; ‘बंदिस्त पाइप’ची चाचणी सुरू 

टीम अॅग्रोवन
रविवार, 18 एप्रिल 2021

आटपाडी तालुक्‍यात टेंभू योजनेचे पाणी सुरू झाले. खरसुंडी ते हिवतड कालव्यातून हिवतड येथून तीन ठिकाणी आणि डाव्या कालव्यातून पारेकरवाडी तलावात पाणी सोडले, तर बंद पाइपलाइनची जागोजागी चाचणीही सुरू केली आहे. 

आटपाडी, जि. सांगली : आटपाडी तालुक्‍यात टेंभू योजनेचे पाणी सुरू झाले. खरसुंडी ते हिवतड कालव्यातून हिवतड येथून तीन ठिकाणी आणि डाव्या कालव्यातून पारेकरवाडी तलावात पाणी सोडले, तर बंद पाइपलाइनची जागोजागी चाचणीही सुरू केली आहे. 

टेंभू योजनेचे पंप गेल्या आठवड्यात सुरू होते. आठ दिवसांपूर्वी घाणंद तलावात पाणी पोहोचले होते. तलाव भरल्यानंतर मागणी असलेल्या भागासाठी कालवा आणि ओढ्याने पाणी सुरू केले आहे. खरसुंडी-हिवतड मुख्य कालव्यावर हिवतड येथून तीन ठिकाणी पाणी सोडले असून, मागणी असलेले चार बंधारे भरून पाणी बंद केली जाणार आहे. डाव्या कालव्यावरील पारेकरवाडी तलावात पाणी चालू केले आहे. पाण्याची मागणी केलेल्या भागाला पाणी सोडण्याचे काम पाटबंधारे विभागाने सुरू केले आहे.

बंद पाइपलाइनची चार दिवसांपासून संबंधित कंपनीने तपासणी करून पाणी सोडण्याची चाचणी सुरू केली आहे. घाणंद वितेरिकावरील मुढेवाडी, कामत या ठिकाणी चाचणी केली. तसेच खरसुंडी वितरिकेवरील बनपुरी, तडवळे, तळेवाडी येथेही चाचणी केली आहे. काही ठिकाणी चाचणी यशस्वी झाली आहे, तर अनेक ठिकाणी पाइपलाइनला गळती लागली आहे. गळती काढून चार दिवसांनंतर दुसरी चाचणी सुरू केली जाणार आहे. त्यानंतर पाइपलाइनची अधिकृतरीत्या चाचणी करून मागणी असलेल्या भागाला पाणी सोडले जाणार आहे. 

मागणी विना नियोजनात अडचणी 
या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. तसेच बहुतांश तलावात मोठा पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणीटंचाई जाणवत नसल्यामुळे अद्याप मोठ्या प्रमाणात पाण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे आलेली नाही. मागणी नसल्यामुळे पाटबंधारे विभागाला पाण्याचे नियोजन करण्यात अडचणी निर्माण झाले आहेत. 


इतर बातम्या
वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा पुणे : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘तौत्के’...
पावसासाठी पोषक वातावरण पुणे : चक्रीवादळामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात वेगाने...
पश्‍चिम महाराष्ट्रातही पाऊस पुणे ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा फटका पुणे, कोल्हापूर...
विदर्भ, मराठवाड्यात पाऊसअमरावती/औरंगाबाद : ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विदर्भ...
कापूस बियाणे विक्री २० मेपासून करा : ‘...नागपूर : विदर्भ, खानदेश विभागांत शेजारच्या...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे ...येवला, जि. नाशिक : कृषी बियाणे रासायनिक खते,...
कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा दणका रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा...
तूर, मूग, उडदाची आयात खुली नागपूर : केंद्र सरकारने हंगामापूर्वी तूर, उडीद...
धूळवाफ पेरणीत लॉकडाउनचा खोडा सांगली ः शिराळा तालुक्यात वारंवार झालेल्या...
आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करा ः...नागपूर : गेल्या वर्षीचा महापूर लक्षात घेऊन...
कुकडीच्या पाण्यासाठी  पारनेरकर एकवटले निघोज, ता. पारनेर : कुकडीच्या पाण्याबाबत पुणे...
पेट्रोल, खतांच्या दरवाढीविरोधात ...मुंबई : पेट्रोल शंभरी पार केल्यानंतर केंद्राने...
गडहिंग्लजमध्ये शेतकऱ्यांकडे नऊ टन...गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : यंदाच्या खरीप हंगामात...
कीटकनाशके विक्रीबाबत तरतुदींचे पालन करा अकोला ः या खरीप हंगामात बियाणे, खते, कीटकनाशके...
परभणीत पीककर्जाच्या उद्दिष्टात ४८६...परभणी ः जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२)...
कोरोना रुग्णालयांचा वीज,  ऑक्सिजन...मुंबई : अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळामुळे...
मॉन्सूनपूर्व कामांना प्राधान्य द्यावे ः...भंडारा : मॉन्सून कालावधीत अचानक उद्‌भवणाऱ्या...
कोरोनाचे नियम पाळून  बाजार समित्या सुरू...नाशिक : जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव...
नगर जिल्ह्यात खरीपपूर्व मशागतीच्या...नगर : एकीकडे कोरोनाचे सावट असताना ग्रामीण भागातील...
लोहा, माहूर तालुक्यांना विम्याची रक्कम...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप...