भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या संचालकांनी ''कॅच द रेन'' या भूजल योजनेच्या जनजागृती अभियानाच
ताज्या घडामोडी
जळगावात मदतनिधीपासून ३५ टक्के शेतकरी वंचित
जळगाव ः जिल्ह्यात अतिपावसात कापूस, उडीद, मूग, ज्वारी, बाजरी, सोयाबीन या पिकांची मोठी हानी झाली. सर्वच पिकांचे नुकसान ७० ते ८० टक्क्यांवर झाल्याने उत्पादन खर्च वाया गेला.
जळगाव ः जिल्ह्यात अतिपावसात कापूस, उडीद, मूग, ज्वारी, बाजरी, सोयाबीन या पिकांची मोठी हानी झाली. सर्वच पिकांचे नुकसान ७० ते ८० टक्क्यांवर झाल्याने उत्पादन खर्च वाया गेला. पंचनामे झाले, निधीची घोषणा करण्यात आली. परंतु अद्याप निधीचे वितरण व्यवस्थित सुरू नसल्याची स्थिती आहे.
फक्त ६५ टक्के शेतकऱ्यांच्या बँक खात्यातच मदतनिधी वितरित झाला आहे. तब्बल ३५ टक्के शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा निधी प्राप्त झालेला नसल्याची स्थिती आहे. जळगाव, चोपडा, यावल, जामनेर, बोदवड भागातील अनेक शेतकरी या निधीसाठी तहसील कार्यालयात चकरा मारीत आहेत. प्रशासनाने हा निधी ९० टक्के शेतकऱ्यांपर्यंत वितरित केल्याचा दावा मागील पंधरवड्यात केला होता.
जिल्ह्यात सुमारे २१ कोटी रुपये निधी सुरवातीला प्राप्त झाला होता. जिल्ह्यात कापूस पिकाचे सुमारे अडीच लाख हेक्टरमध्ये उडीद व मुगाचे सुमारे २५ हजार हेक्टरवर तर सोयाबीनचेदेखील सुमारे १४ हजार हेक्टरवर मोठे नुकसान झाले. निधी तोकडा असतानादेखील त्याचे वितरण घोषणेनुसार दिवाळीला केले नाही. गेल्या पंधरवड्यात निधी वितरण सुरू झाले. लागलीच प्रशासनाने निधी वितरणाचे दावे सुरू केले. परंतु, निधीचे वितरण अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यात झालेले नाही. यामुळे शेतकरी या निधीच्या प्रतीक्षेत आहेत.
अनेक भागात तलाठी व इतरांनी बँक खाते, आधार क्रमांकातील चुका करून ठेवल्याने शेतकरी निधीपासून वंचित आहेत. तर, अनेकांची नावेच नुकसानग्रस्तांच्या यादीत नाहीत. नुकसानग्रस्तांची यादी प्रशासनाने जाहीर केलीच नाही, असा आरोपही शेतकरी करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे. निधीचे वितरण शेतकऱ्यांना करावे.
- 1 of 1059
- ››