पहाटेच्या शपथविधीची विधानसभेत आठवण

Remembering the affidavit in the morning
Remembering the affidavit in the morning

मुंबई ः देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथेवरून गुरुवारी (ता. २७) विधानसभेत शाब्दिक टोलेबाजी पहायला मिळाली. 

मराठा समाजाच्या तरुणांचे आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनाचा मुद्दा भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत मांडला. याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, मराठा समाजाचे लोक आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्या प्रश्नातून काही मार्ग निघत नाही. काही मुलांची सेवा सामावून घ्यावी, अशी मागणी आहे. अजित पवार ‘ऑन द स्पॉट’ निर्णय घेतात. जसा त्यांनी रात्री निर्णय घेतला आणि सकाळी शपथविधी झाला. अजित पवारांनी मराठा आंदोलक तरुणांबाबत तसाच निर्णय घ्यावा, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी फडणवीसांसोबत घेतलेल्या शपथेचा दाखला दिला.

चंद्रकांत पाटील यांच्या या दाखल्यानंतर अजित पवार म्हणाले, दोन-तीन दिवसांत मराठा आंदोलकांबाबत बैठक घेऊन निर्णय घेऊ. त्यात काही वेगळे मुद्दे आहेत. मग अजित पवारांनी चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या शपथेच्या दाखल्यावर भाष्य केले. ते म्हणाले, चंद्रकांतदादा तुम्ही म्हणाला रात्री निर्णय घेतला आणि सकाळी शपथ घेतली, अजित पवार असे म्हणत असतानाच देवेंद्र फडणवीसांनी मध्येच हस्तक्षेप केला. देवेंद्र फडणवीस अजित पवार यांना उद्देशून लगेचच बोलले की तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही बोलू नका, मीही बोलत नाही. मग अजित पवार फडणवीस यांना उद्देशून म्हणाले, ते आता बोलले आहेत, त्यामुळे मी आता बोलत नाही.

२३ नोव्हेंबरला पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला होता. मात्र, अजित पवारांनी ३ दिवसांनी २६ नोव्हेंबरला राजीनामा दिल्याने फडणवीस सरकार कोसळले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com