agriculture news in marathi, remembrance day of balasaheb thackery, mumbai, maharashtra | Agrowon

शिवसेनाप्रमुखांचा आज स्मृतिदिन

टीम अॅग्रोवन
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

मुंबई  : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (रविवारी) स्मृतिदिन असून, शिवाजी पार्क येथील कार्यक्रमात दोन्ही कॉंग्रेसचे नेतेही बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करणार आहेत. तसेच, यानिमित्ताने त्यांना मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातून लाखो शिवसैनिकांची गर्दी शिवतीर्थावर उसळणार आहे.

मुंबई  : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (रविवारी) स्मृतिदिन असून, शिवाजी पार्क येथील कार्यक्रमात दोन्ही कॉंग्रेसचे नेतेही बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करणार आहेत. तसेच, यानिमित्ताने त्यांना मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातून लाखो शिवसैनिकांची गर्दी शिवतीर्थावर उसळणार आहे.

दरम्यान, रविवारी एनडीएने घटकपक्षांची बैठक बोलावली आहे. मात्र, या बैठकीला शिवसेनेचे नेते सहभागी होणार नाहीत. कारण, सगळे शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवतीर्थावर जमणार आहेत. या वेळी बदललेल्या राजकीय समीकरणामुळे दोन्ही कॉंग्रेसचे काही नेतेही उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना नमन करण्यासाठी आज हजारो नागरिक शिवाजी पार्कवर जमणार आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी रंगरंगोटी आणि इतर व्यवस्था केली आहे. आज या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात असणार आहे. पदाधिकारी आणि आमदारांसाठी एक वेगळे गेट असणार आहे. याचबरोबर मोठ्या प्रमाणावर सामान्य नागरिकदेखील या ठिकाणी येणार असल्याने त्यांच्यासाठी दोन वेगळ्या गेटची सुविधा करण्यात आली आहे. 

राज्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस लवकरच सरकार स्थापन करणार आहे. अशात आज शिवसेनेव्यतिरिक्त राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे अनेक मोठे नेते हे शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस नमन करण्यास येण्याची शक्‍यता आहे. 


इतर ताज्या घडामोडी
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...
पोल्ट्री उद्योगाला हवा मदतीचा हातपुणे: बाजारभावातील नरमाईमुळे पोल्ट्री उद्योग...
हापूस निर्यातीसाठी निर्यातीसाठी पणन...रत्नागिरी ः निर्यातीत हापूसचा टक्का घसरत असून तो...
नीरा देवधर, गुंजवणीतून समन्यायी पाणीवाटपमुंबई ः नीरा देवघर व गुंजवणी धरणांचे कालवे...
तापमानवाढीचा धोका वेळीच ओळखावा लागेल:...औरंगाबाद: निसर्गाच्या दोलायमानतेत मानवी...
नगरमधील नऊ तालुक्यांत तेलबियांची पेरणीच...नगर ः तेलबियांची (गळीत धान्य) पेरणी वाढावी यासाठी...
सातारा जिल्ह्यात ५५ लाख क्विंटल...सातारा : जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या गाळपाची...
निर्यातबंदीमुळे कांदा फुगवटा;...पुणे: कांद्यावरील संपूर्ण निर्यातबंदी तातडीने...
खानदेशात कांदा लागवड १४ हजार हेक्‍टरवरजळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामातील कांदा...
‘कर्जमुक्ती योजनेसाठी येणाऱ्या...अकोला  ः  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
द्राक्षपट्ट्यासह आदिवासी भागात खुलली...नाशिक  : स्ट्रॉबेरी लागवडीसाठी महाबळेश्वरची...
सांगलीत हळदीच्या उत्पादनात घटसांगली : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात आलेला महापूर...
चांद्यात फ्लॉवरच्या निकृष्ट...नगर : तेलंगण राज्यातील एका बियाणे कंपनीचे...
'थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय कायम...सोलापूर  ः राज्य सरकारने थेट जनतेतून सरपंच...
औरंगाबाद जिल्ह्यातील टंचाई...औरंगाबाद : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईचे...
लातूर विभागातील दोन हजार हेक्टरवर फळबाग...नांदेड : कृषीच्या लातूर विभागांतर्गतच्या परभणी,...
अकोला बाजार समितीचे गरजूंना पाठबळअकोला ः कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराने...
उशिराच्या गव्हाला वाढत्या तापमानाचा...जळगाव  ः खानदेशात गहू पिकाची स्थिती...