गोपीनाथराव मुंडे खऱ्या अर्थाने लोकोत्तरनेते : मुख्यमंत्री फडणवीस

गोपीनाथराव मुंडे लोकोत्तरनेते : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गोपीनाथराव मुंडे लोकोत्तरनेते : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परळी, जि. बीड : कुठलेही राजकीय पाठबळ, संघटन मागे नसताना हिंमत आणि आत्मविश्वासाने नाथरा (ता. परळी) ते न्यूयॉर्क असा प्रवास केला. त्यामुळेच दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे खऱ्या अर्थाने लोकोत्तर नेते होते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.  दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृती दिनानिमित्त रविवारी (ता. ३) परिसरातील गोपीनाथगडावर झालेल्या अभिवादन सामाजिक उत्थान दिन कार्यक्रमात ते बोलत होते. छत्रपती खासदार उदयनराजे भोसले, छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले, मंत्री राम शिंदे, मंत्री महादेव जानकर, मंत्री विजयराव देशमुख, मंत्री सदाभाऊ खोत, संघटन मंत्री भाऊराव देशमुख, विजयराव पुराणिक, आमदार संगीता ठोंबरे, आमदार सुरजितसिंह ठाकूर, आमदार आर. टी. देशमुख,  आमदार शिवाजी कर्डीले, मोनिका राजळे, विजय गव्हाणे यांच्यासह मुंडेंच्या पत्नी प्रज्ञा मुंडे, कन्या व राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, यशश्री मुंडे यांची उपस्थिती होती.       श्री. फडणवीस म्हणाले, की दिवंगत मुंडे पराभवाने खचले नाहीत विजयाने मातले नाहीत. मुंडे वंचितांचा आवाज होते. महाराष्ट्राचा सामाजिक राजकीय इतिहास त्यांच्या नावाशिवाय पूर्ण होत नाहीत. गृह खाते हाती घेतल्यानंतर गुन्हेगारी मुक्त व खंडणी मुक्त करण्याचे काम त्यांनी केले. सहकार क्षेत्रात अनुभव नसताना उतरले दबदबा निर्माण केला. त्यांचा वारसा पंकजा मुंडे चालवत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com