agriculture news in Marathi remove conditions from cotton procurement Maharashtra | Page 3 ||| Agrowon

कापूस विक्रीकरीता शेतकरी मर्यादेची अट शिथील 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 मे 2020

कापूस खरेदीकरीता असलेली शेतकरी मर्यादेची अट शिथील करण्यात आली आहे. कोरोना संदर्भात शिफारसीत उपाययोजनांची अंमलबजावणी करीत कापसाची खरेदी व्हावी त्याकरीता रोज ठरावीक शेतकरी संख्येचा निकष राहणार नाही.

नागपूर ः कापूस खरेदीकरीता असलेली शेतकरी मर्यादेची अट शिथील करण्यात आली आहे. कोरोना संदर्भात शिफारसीत उपाययोजनांची अंमलबजावणी करीत कापसाची खरेदी व्हावी त्याकरीता रोज ठरावीक शेतकरी संख्येचा निकष राहणार नाही, असे पत्रच या पार्श्‍वभूमीवर सीसीआयने देशभरातील त्यांच्या अधिनस्त अधिकाऱ्यांना दिले आहे. 

महाराष्ट्रासह राज्यातील अनेक जिल्हयांमध्ये ५५५० रुपयांच्या हमीभावाने कापसाची खरेदी केली जात आहे. महाराष्ट्रात सीसीआय तसेच त्यांचा एजंट म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाकडून सद्या कापूस घेतला जात आहे. राज्यात कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी विविध उपाययोजनांवर भर दिला गेला आहे. त्या नियमांचे पालन करीत रोज ३५ ते ४० या मर्यादीत संख्येतील शेतकऱ्यांकडूनच कापूस खरेदी होत आहे. 

राज्यात शेतकऱ्यांच्या घरात ९० ते १०० लाख क्‍विंटल कापूस शिल्लक आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना मर्यादीत शेतकरी संख्येत कापूस खरेदी होत असल्याने शिल्लक कापसाच्या खरेदीस बराच कालावधी लागणार आहे. त्यामुळे खरेदी केंद्रावरील शेतकरी मर्यादेचा निकष हटवावा, अशी मागणी होत होती. 

राज्यातील अनेक नेत्यांनी याबाबत सीसीआयशी पत्रव्यवहार केला. यामुळे दबाव वाढलेल्या सीसीआयने अखेरीस रोजची ४० ते ५० शेतकऱ्यांकडील कापूस खरेदीच्या मर्यादेची अट शिथील केली आहे. त्यामुळे राज्यातील कापूस केंद्रावर आता शेतकरी संख्येची अट राहणार नाही.

यापुढे प्रत्येक केंद्रावर १०० किंवा त्यापेक्षा अधिक नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी बोलावण्यात येईल, अशी माहिती आहे. एकट्या अकोला जिल्हयात कापूस विक्रीच्या प्रतिक्षेत असलेल्या २४ हजारावर शेतकऱ्यांसाठी ही बाब दिलासादायक ठरली आहे. 


इतर अॅग्रो विशेष
वाद-प्रतिवादांचा खेळ अन् हतबल शेतकरीनिकृष्ट बियाण्यांमुळे सोयाबीन न उगवल्याच्या...
शेतकऱ्यांनो, एक वर्ष सुटी घ्यायची का?जगभरात जनुकीय सुधारित (जेनिटिकली मॉडिफाइड/जीएम)...
...अन्यथा कृषी सहसंचालकांना अटक करून...औरंगाबाद ः सोयाबीनच्या बोगस बियाणे प्रकरणात...
`गोसेखुर्द'चे भू-संपादन संपेनानागपूर : गोसेखुर्द प्रकल्पाच्या कामाचा...
काटेपूर्णा, पेनटाकळी, खडकपूर्णा ...अकोला ः वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांत आत्तापर्यंत...
नगर जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात...नगर  ः जिल्ह्यात यंदा सुरुवातीपासूनच चांगला...
दुग्धोत्पादकांना लिटरमागे १० ते १२...नगर ः अनेक शेतकऱ्यांसह बेरोजगारीवर मात करण्यासाठी...
धरणांच्या पाणलोटात पावसाचा जोरपुणे : कोकण किनारपट्टीलगतच्या अरबी समुद्रात...
अमेरिकन लष्करी अळीचे मका पिकावर आक्रमणपुणे ः खरिपाची पेरणी होऊन महिना उलटत नाही तोच...
रासायनिक अवशेष काढण्यासाठी 'अर्का...नाशिक ः फळे आणि भाजीपाला पिकांवर रासायनिक...
देशात ९२ लाख हेक्टरवर कापूसमुंबई: देशात कापूस लागवडीने वेग घेतला आहे....
राज्यातील धरणांमध्ये २८ टक्के पाणीसाठापुणे : जून महिन्यात पावसाने सरासरी गाठली, तसेच...
पॉलीहाऊसमध्ये फुलला दर्जेदार पानमळाकोल्हापूर जिल्ह्यातील निमशिरगाव (ता.शिरोळ) येथील...
`बॅलन्स`अभावी शेतकऱ्याला दिलेला चेक...अकोला ः अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई...
‘आपले सरकार’ पारदर्शकच हवेचालू खरीप हंगामासाठी पीकविमा भरण्याची अंतिम मुदत...
शेती म्हणजे रोजगार हमी योजना आहे का?खूप दिवसांनंतर एका कार्यकर्ता मित्राचा फोन आला....
मराठवाड्यात कपाशीची ८० टक्के पेरणीऔरंगाबाद :  सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत...
सोयाबीन बियाणेप्रकरणी ३० हजार तक्रारी ः...यवतमाळ : सोयाबीन बियाणे उगवणाबाबत मोठ्या प्रमाणात...
मुंबईसह उत्तर कोकणात जास्त, तर दक्षिणेत...पुणे : राज्याच्या विविध भागांत हलक्या ते...
क्रांती कारखान्याचा ऊस बेण्यासाठी ‘माझी...सांगली : शेतकऱ्यांना दर्जेदार ऊस बेणे मिळाले तरच...