agriculture news in marathi, Remove law against farmers : Amar Habib | Page 3 ||| Agrowon

शेतकरीविरोधी कायदे रद्द करा : अमर हबीब
गणेश कोरे
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना कारणीभूत ठरलेले कमाल शेतजमीन धारणा (सिलिंग), जीवनावश्‍यक वस्तू आणि जमीन अधिग्रहण हे शेतकरीविरोधी कायदे सरकारने तात्काळ रद्द करण्याची गरज आहे. शेतकरी स्वातंत्र्यासाठी हाच आमचा जाहीरनामा आहे. हे कायदे रद्द करून शेतकऱ्यांना इतर नागरिकाप्रमाणे व्यवसायाचे स्वातंत्र्यदेखील देण्याची आवश्‍यकता आहे. 

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना कारणीभूत ठरलेले कमाल शेतजमीन धारणा (सिलिंग), जीवनावश्‍यक वस्तू आणि जमीन अधिग्रहण हे शेतकरीविरोधी कायदे सरकारने तात्काळ रद्द करण्याची गरज आहे. शेतकरी स्वातंत्र्यासाठी हाच आमचा जाहीरनामा आहे. हे कायदे रद्द करून शेतकऱ्यांना इतर नागरिकाप्रमाणे व्यवसायाचे स्वातंत्र्यदेखील देण्याची आवश्‍यकता आहे. 

जमिनीचे विखंडन थांबवून शेतीत गुंतवणुकीचे दार उघडण्यासाठी व प्रतिभावंतांना शेतीचे आकर्षण वाटावे यासाठी सिलिंगच्या कायद्यात सुधारणा करण्याची गरज आहे आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना या कायद्यातून वगळण्यात यावे, अशी आमची मागणी आहे. जीवनावश्यक वस्तू कायद्यामार्फत सरकार वारंवार हस्तक्षेप करते. शेतीमालाच्या बाजारपेठेत हस्तक्षेप करून भाव पाडले जातात. या कायद्यामुळे परवाना, परमिट, कोटा व इन्स्पेक्टर राज निर्माण असून नोकरशाही मुजोर बनली आहे. भ्रष्टाचाराने देश पोखरला गेला आहे. शेतीमालावर प्रक्रिया करणारे कारखाने तयार झाले नाहीत, बेरोजगारी वाढली. शेतकऱ्यांना आपल्या मालाची किंमत ठरवता यावी व शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग निर्माण व्हावेत यासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा रद्द करण्यात यावा. सरकारने हे केले नाही तर आम्ही हे कायदे कायमचे संपून टाकणार आहोत.

शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करून खासगी व्यावसायिक, संस्था व कारखानदारांना देण्याचा सरकारचा अधिकार देखील काढून टाकण्यात यावा. सार्वजनिक कामासाठी सरकारला जमीन हवी असल्यास त्यासाठी वाजवी व वक्तशीर मोबदला देण्याची व्यवस्था सरकारने केल्याशिवाय शेतकरी जमिनी देणार नाहीत. जमिनीचा वापर, भाड्याने देणेघेणे, करार शेती यावर असलेली सर्व बंधने तात्काळ काढून टाकण्यात यावीत, तर शेतजमिनीची कमाल मर्यादा ठरवणारा कायदा रद्द करण्यात येणे आवश्‍यक आहे. 

कृषी उत्पन्न बाजार समित्या या संघटित गुन्हेगारीचे अड्डे तयार झाले आहेत. शेतकऱ्यांना कुठेही शेतमाल विक्री करता यावा यासाठी बाजार समिती कायद्यासारख्या शेतमालावर सरकारी नियंत्रण ठेवणारे कायदे नष्ट करून बाजार व्यवस्था सक्षम आणि पारदर्शी करण्याची गरज आहे. शेतकरी खऱ्या अर्थाने पर्यावरण संवर्धन आणि रक्षण करत असतो. यामुळे जगातील इतर देशाप्रमाणे आपल्या राज्यात शेतकऱ्यांना ''कार्बन क्रेडिट'' देण्यात यावे. 

आदिवासी शेतकऱ्यांना त्यांच्या मालकीची जमीन कोणाला विकायची हे ठरविण्याचा पूर्ण अधिकार देण्यात यावा. शेतकऱ्यांना पारतंत्र्यात ठेवणारे सर्व कायदे, मूळ संविधानात नसलेल्या व नंतर घुसडलेल्या ९ व्या परिशिष्टात समाविष्ट केले आहेत, या कायद्यांच्या विरोधात न्यायालयात दाद मागता येत नाही. म्हणून शेतकऱ्यांवर ''न्यायबंदी'' लादणारे घटनाबाह्य ९ वे परिशिष्ट रद्द करण्यात यावे, अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत.

- अमर हबीब, किसानपुत्र आंदोलन
(शब्दांकन : गणेश कोरे)

इतर अॅग्रो विशेष
चक्रीवादळे, मुसळधारेने ‘भाता’चे कंबरडे...रत्नागिरी : राज्यातील आठ विभागांपैकी पाच विभागांत...
‘बुलबुल’ चक्रीवादळामुळे पूर्व, ईशान्य...पुणे: बंगालच्या उपसागरातील ‘बुलबुल’ अतितीव्र...
अतिपावसामुळे लाल कांद्याचे आगार धोक्यातनाशिक : राज्यातील कांदा उत्पादनाचे मुख्य आगार...
राज्यात थंडीची चाहूलपुणे : राज्यातील किमान तापमान कमी होऊ लागल्याने...
वेबसाइटवरून विमा पावत्या ‘डिलीट’ !पुणे : राज्यातील शेतकऱ्यांची पावसामुळे अतोनात...
रब्बी पेरा ७० लाख हेक्टरवर जाणारः सुहास...पुणे: राज्यात यंदा रब्बीचा पेरा ७० लाख हेक्टरवर...
राज्यातील शेतकऱ्यांना सुखी, समाधानी ठेव...पंढरपूर, जि. सोलापूर: दुष्काळ आणि...
मका उत्पादकांना १५०० कोटींचा थेट फटकाअकोला : राज्यात ऑक्टोबरमधील परतीच्या पावसाने...
भिजलेल्या कापसाचे दर निम्म्यावरनगर ः मोठ्या संकटातून वाचलेला कापूस यंदा पावसाने...
राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाजपुणे (प्रतिनिधी) ः गेल्या दोन दिवसांपासून...
पीएम-किसानच्या पोर्टलवर दीपकचा झाला ‘...नांदुरा, जि. बुलडाणा ः शेतकऱ्यांना सध्या सर्वच...
सुरळीच्या अनुप यांनी जपली प्रयोगशीलता...अमरावती जिल्ह्यातील सुरळी (ता. चांदूरबाजार) येथील...
फळबागा केंद्रीत कोरडवाहू शेतीचा साधला...परभणी जिल्ह्यातील उजळंबा येथील प्रगतिशील शेतकरी...
सांगली : द्राक्षच्या उत्पादन खर्चातच...सांगली : चार वर्षांपासून जिल्ह्यात...
कलेढोणात अतिपावसामुळे द्राक्षबागांवर...कलेढोण, जि. सातारा : अतिपावसामुळे खटाव...
देशाची सामाजिक उद्योजकता दुर्लक्षित;...पुणे : देशातील अनेक तरुण-तरुणींना शेती...
कार्तिकीचा आज मुख्य सोहळासोलापूर ः कार्तिकी यात्रेच्या सोहळ्यात सहभागी...
पंचनाम्यासाठी २० लाख विमाधारकांचे...पुणे: राज्यात अतिपावसानंतर आत्तापर्यंत २० लाख...
‘महा’ चक्रीवादळ निवळले; बुलबुलची...पुणे : ‘महा’ चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने येताना...
रब्बी विम्यासाठी दहा जिल्हे रखडणारपुणे (प्रतिनिधी) : ऑक्टोबरमधील चांगल्या...