agriculture news in Marathi remove lock down from agriculture Maharashtra | Agrowon

शेतीवरील लॉकडाऊन हटवा : किसान संघर्ष समन्वय समिती

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 14 एप्रिल 2020

रबी हंगामातील शेतीमालाची १०० टक्के खरेदी एमएसपी दराने व्हावी. खासगी व्यापाऱ्यांनाही एमएसपी दरानेच खरेदी बंधनकारक करावी.

नवी दिल्लीः रबी हंगामातील शेतीमालाची १०० टक्के खरेदी एमएसपी दराने व्हावी. खासगी व्यापाऱ्यांनाही एमएसपी दरानेच खरेदी बंधनकारक करावी. तसेच रबी हंगामातील शेतीमालाप्रमाणेच फळे आणि भाजीपाल्यासाठी देखील एमएसपी (किमान आधारभूत दर) जाहीर करावे, अशी मागणी देशभरातील शेतकरी संघटनांचा महासंघ असलेल्या अखिलभारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. 

शेतकरी संघटनांनी म्हटले आहे, की सरकारने लॉकडाऊनमध्ये शेतीच्या कामांना सवलत दिली असल्याचे आदेश काढले आहेत. परंतु प्रत्यक्षात याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. कोरोनाशी संपूर्ण देश घरात बसून आणि शेतकरी शेतात जाऊन लढतो आहे. या शौर्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असताना त्यांना एमएसपीपेक्षा कमी दराने शेतीमालाची विक्री करावी लागते आहे. सरकारी खरेदी यंत्रणांचा अभाव हे त्यामागचे मोठे कारण आहे. 

‘‘गव्हाची एमएसपी १९२५ रुपये प्रतिक्विंटल आहे. पण खासगी व्यापारी अवघ्या १४०० ते १७०० रुपयांनी गहू खरेदी करत आहेत. त्यामुळे सरकारी खरेदी यंत्रणांनी शेतकऱ्यांकडून एमएसपी दरानेच शेतीमाल खरेदी करावा.

केंद्र किंवा राज्यसरकारची यंत्रणा आर्थिक अडचणीमुळे खरेदी करू शकत नसेल तर खासगी व्यापाऱ्यांनी एमएसपी पेक्षा कमी दराने खरेदी करता कामा नये, असे बंधनकारक करावे. फळे आणि भाजीपाल्याची देखील अवघ्या दोन ते चार रुपये किलो, अशा पडत्या भावाने खरेदी सुरू आहे. त्यामुळे उत्पादकांना नाशवंत माल फेकून द्यावा लागतो आहे. या नाशवंत मालासाठीही एमएसपी निश्चित करावा,’’ अशी मागणी केली आहे. 

कोरोनामुळे असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शेती व्यवसायापुढील अडचणी पाहता शेतकरी संघटनांनी पंजाब, मध्यप्रदेश, ओडिशा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना स्वतंत्रपणे पत्रे लिहून या अडचणी दूर करण्याची मागणी केली आहेच, आता राष्ट्रीय पातळीवरील निर्णयासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवून आवाहन केले आहे.

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे समन्वयक व्ही. एम. सिंग, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, अखिल भारतीय किसान सभेचे हनन मौला, स्वराज अभियानचे योगेंद्र यादव, जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय संघटनेच्या मेधा पाटकर, किसान महापंचायतचे रामपाल जाट आदी या समन्वय समितीचे सदस्य आहेत. 
 


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात जोरदार पावसाचा पिकांना फटकाऔरंगाबाद, परभणी : औरंगाबाद, जालना, बीड, लातूर,...
हजारो टन कांदा निर्यातीच्या प्रतीक्षेतमुंबई/नाशिक : देशभरात कांदा निर्यातबंदी...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवरकोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७...
तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यतापुणे ः बंगालचा उपसागर व उत्तर तामिळनाडूच्या...
दूध सल्लागार समिती कागदावरचपुणे : राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीची एकही बैठक...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
स्पर्धेत टिकण्यासाठी ‘ई-नाम’केंद्र सरकारने कृषी, पणन व्यवस्थेत सुधारणा घडवून...
बाजार सुधारणांत नको राजकीय धुळवडकोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या संसद...
सुपारी फळगळीचे संकटसिंधुदुर्ग: मुसळधार झालेला पाऊस आणि सतत ढगाळ...
कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्यतापुणे ः गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही...
कांदा निर्यातबंदीविरोधात मराठवाड्यातही...औरंगाबाद/परभणी: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी...
निर्यातबंदीमुळे कांदा दरात मोठी घसरणनाशिक: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याचा...
कांदा निर्यातबंदी विरोधात नाशिक...नाशिक: प्रतिकूल हवामान, वाढलेला उत्पादन खर्च व...
‘स्मार्ट’च्या २८ पथदर्शक प्रकल्पांना...पुणे: कृषी खात्याच्या ‘स्मार्ट’ प्रकल्पातून...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष फळ छाटणी...सांगली ः जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...
राज्यात तीन वर्षांत ‘ई-नाम’द्वारे ...पुणे: केंद्र सरकारने सुरु केलेल्या राष्ट्रीय...
दर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...