कांदा निर्यातबंदी उठवा; राज्याचे केंद्र सरकारला पत्र

देशभरात कांद्याचे दर वाढल्याने केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी लागू केली. आता महाराष्ट्रात कांद्याची आवक वाढली असून, कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. या पार्श्‍वभूमीवर बळिराजासाठी कांद्यावरील निर्यात बंदी मागे घ्यावी, किमान निर्यातमूल्यही टप्प्याटप्प्याने शून्य करावे, असे पत्र राज्य सरकारने केंद्राला पाठविले आहे. - यू. एस. घाद्याळे, उपसचिव, पणन
कांदा निर्यातबंदी उठवा; राज्याचे केंद्र सरकारला पत्र
कांदा निर्यातबंदी उठवा; राज्याचे केंद्र सरकारला पत्र

सोलापूर : महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये कांद्याचे उत्पादन घटल्याने कांद्याचे दर वाढले होते. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदीचा निर्णय घेतला. आता देशभर कांद्याची आवक वाढली असून, कांद्याचे दर गडगडल्याने बळिराजा अडचणीत सापडला आहे. कांद्याचे दर स्थिर राहण्यासाठी निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्यावा, असे पत्र ठाकरे सरकारने मोदी सरकारला पाठविले आहे. ८५० डॉलरचे निर्यातमूल्यही टप्प्याटप्प्याने शून्य करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. देशभरातील विविध राज्यांतील अतिरिक्‍त उत्पादित कांदा ‘अपेडा’च्या माध्यमातून परदेशात निर्यात केला जातो. महाराष्ट्रातून २०१६- १७ ते २०१८-१९ या तीन वर्षांत एकूण ६१ लाख ८८ हजार टन कांदा निर्यात झाला. सर्वाधिक कांदा बांगलादेशात निर्यात झाला तर उर्वरित यूएई, मलेशिया, नेपाळ, श्रीलंका, सिंगापूर, आफ्रिका, ब्राझील, इंग्लंड, रशिया, इटली, चीन, नेदरलॅण्ड, हाँगकाँग, हंगोला या देशांत निर्यात करण्यात आली होती. मागील वर्षी दुष्काळ तर यावर्षीचा महापूर व अवकाळीमुळे कांदा लागवडीचे क्षेत्र घटले आणि कांदा उत्पादन कमी झाले. त्यामुळे कांद्याचे दर प्रतिक्‍विंटल २० हजारांपर्यंत पोहचले. त्यामुळे केंद्र सरकारला परदेशातून कांदा आयात करावा लागला. 

दरम्यान, आता कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढल्याने बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढली आहे. मात्र कांद्याचे दर प्रतिक्‍विंटल सरासरी दिड ते दोन हजारांवर पोचल्याने बळिराजा अडचणी सापडला आहे. या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा, त्यांचा उत्पादन खर्च निघावा या हेतूने केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवावी, असेही त्या पत्रात म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com