Agriculture news in Marathi Renewal of insurance plans starting from today | Page 2 ||| Agrowon

कोल्हापुरात विमा योजनांच्या नूतनीकरणास आजपासून प्रारंभ

टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 मे 2020

कोल्हापूर : जिल्ह्यातील ११ लाख ७२ हजार बँक ग्राहकांनी सुरक्षा विमा आणि जीवन ज्योती विमा योजनेत सहभाग नोंदविला आहे, या विमा योजनांच्या नूतनीकरणास सोमवार (ता. २५) पासून विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अग्रणी प्रबंधक राहुल माने यांनी दिली.

कोल्हापूर : जिल्ह्यातील ११ लाख ७२ हजार बँक ग्राहकांनी सुरक्षा विमा आणि जीवन ज्योती विमा योजनेत सहभाग नोंदविला आहे, या विमा योजनांच्या नूतनीकरणास सोमवार (ता. २५) पासून विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अग्रणी प्रबंधक राहुल माने यांनी दिली.

श्री. माने म्हणाले की, पंतप्रधान सुरक्षा विमा व पंतप्रधान जीवन ज्योती विमा नूतनीकरण मोहीम जिल्ह्यात दिनांक २५ मे ते १ जून २०२० या कालावधीत राबविण्यात येणार आहे. देशामध्ये सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा प्रणाली अस्तित्वात आणण्यासाठी ९ मे २०१५ रोजी सामाजिक सुरक्षिततेच्या पंतप्रधान सुरक्षा विमा योजना व पंतप्रधान जीवन ज्योती विमा या दोन महत्त्वाकांक्षी योजना सर्व बँकांच्या माध्यमातून गरीब व वंचित घटकांसाठी सुरू केल्या आहेत.

जिल्ह्यात पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेअंतर्गत ७ लाख ८० हजार बँक ग्राहकांनी तर जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत ३ लाख ९२ हजार बँक ग्राहकांनी सहभाग नोंदविला असून यापुढील काळातही जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी त्यांचे बँक खाते असणाऱ्या बँकेत या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. माने यांनी केले आहे.

पंतप्रधान सुरक्षा विमा योजना ही अपघाती मृत्यू व अपंगत्व यासाठी २ लाखापर्यंत विमा संरक्षण देणारी योजना असून वय वर्षे १८ ते ७० वयोगटातील व्यक्ती यामध्ये सहभाग घेऊ शकतात. या योजनेचा वार्षिक हप्ता केवळ बारा रुपये आहे. तर जीवन ज्योती विमा योजना ही नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू झाल्यास २ लाखापर्यंत विमा संरक्षण देणारी योजना असून वय वर्षे १८ ते ५० वयोगटातील व्यक्ती यामध्ये सहभाग घेऊ शकतात. या योजनेचा वार्षिक हप्ता ३३० रुपये आहे.

जिल्ह्यातील नागरिकांनी आपले बँक खाते ज्या बँकेत आहे, त्या शाखेत, बँकेतर्फे नेमणूक करण्यात आलेल्या व्यवसाय समन्वयक व ग्राहक सेवा केंद्रात अर्ज करावा. तसेच पोस्ट बँकेत, पोस्ट ऑफिसमध्येही अर्ज करता येतो. जे ग्राहक या विमा योजनेपासून वंचित आहेत त्यांनी आपल्या बँक शाखेशी, व्यवसाय समन्वयक ग्राहक सेवा केंद्राशी किंवा पोस्ट ऑफिसशी संपर्क साधून या विमा योजनांमध्ये आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहनही श्री. माने यांनी केले


इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यात टंचाईमुळे जादा दराने...जळगाव : जिल्ह्यात यंदा पेरणी वेळेत झाली, पण...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड आदी...
बीड विभागात १८ लाख क्विंटल कापसाची खरेदीबीड  ः राज्य कापूस पणन महासंघाच्या बीड...
महाळूंग येथील कोविड केअर सेंटरला `आयएसओ...सोलापूर : माळशिरस तालुक्‍यातील महाळूंग येथील...
नांदेड, परभणी, हिंगोलीत खतांसाठी...नांदेड : यंदा नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांनी...
नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांची धावपळ,...नाशिक : खरीप पिकांना वाढीच्या अवस्थेत खतांची...
पीकविमा प्रस्ताव सादर करण्यासाठी ३१...परभणी : ‘‘पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत...
महाराष्ट्राच्या विकासात डॉ. चव्हाण...मुंबई : जनसेवा, राज्याची आणि देशाची सेवा...
सोलापूरसह नजीकच्या गावांमध्ये ...सोलापूर  : सोलापूर शहर आणि शेजारील...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांच्या...नाशिक : खरीप हंगामात जिल्ह्यातील सोयाबीनची पेरणी...
नगरमध्ये मागणीच्या ५० टक्केच युरिया...नगर ः जोमात असलेल्या खरीप पिकांसाठी युरियाची...
शेतकऱ्याने तुटपुंज्या मदतीचा धनादेश...नाशिक : निसर्ग चक्री वादळाने ३ जून रोजी येवला...
अकोला : आवश्‍यक खते मिळवताना...अकोला ः या हंगामातील पिकांची लागवड होऊन बहुतांश...
सिंधुदुर्गात खते मिळाली; पण वेळेत नाहीतसिंधुदुर्ग ः खरीप हंगामाच्या सुरुवातीला जिल्ह्यात...
बुलडाण्यात सोयाबीनबाबत २७०० पेक्षा अधिक...बुलडाणा ः निकृष्ट बियाणे तसेच इतर कारणांमुळे...
विदर्भात खत कमतरतेमुळे जादा दराने विक्रीनागपूर : विदर्भातील सर्व जिल्ह्यात सध्या युरियाची...
रत्नागिरी जिल्ह्यात पुरेसा खत पुरवठारत्नागिरी : खरीप हंगामाच्या सुरुवातीला वेळेत खत न...
सांगलीत खतांची कमतरतासांगली ः जिल्ह्यात ८० टक्के खतांचा पुरवठा केला...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा इशारापुणे : राज्यात मॉन्सून सक्रीय होण्यास पोषक हवामान...
मराठवाड्यात आतबट्ट्याचा दुग्ध व्यवसायऔरंगाबाद : दर दिवसाच्या दूध संकलनात फरक पडला नाही...