Repair of Bandalagi dam on Seena river completed
Repair of Bandalagi dam on Seena river completed

सीना नदीवरील बंदलगी बंधाऱ्याची दुरुस्ती पूर्ण

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना नदीवरील बंदलगी बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलने केली. त्यानंतर सातत्याने पाठपुरावा केला. अखेर चार वर्षांनी बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले आहे.

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना नदीवरील बंदलगी बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलने केली. त्यानंतर सातत्याने पाठपुरावा केला. अखेर चार वर्षांनी बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहिसा दिलासा मिळाला आहे. 

सीना नदीवर बंदलगी येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. २०१६ मध्ये नदीला आलेल्या महापुरात बंधाऱ्याचे काही दरवाजे वाहून गेले. त्यानंतर नदीपात्रात पाणी अडवता येत नसल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर झाला. या बंधाऱ्याचा या भागातील सात ते आठ गावांना फायदा होतो. पण बंधाऱ्याच्या या स्थितीमुळे बागायत पिके जळू लागली.

या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांनी एकत्रित येत संघर्ष समिती स्थापन केली. तसेच अनेकवेळा आंदोलने झाली. याच प्रश्नावर बोळकवठेचे माजी सरपंच राम गायकवाड, औरादचे गुरुनाथ दाते, श्रीशैल वाले यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी सातत्याने आंदोलन करुन या प्रश्नाकडे लक्ष वेधले.

दीड कोटीचा निधी खर्च

बंधाऱ्याच्या या कामासाठी एक कोटी ५६ लाखांचा निधी मंजूर झाला होता. २०१८ मध्ये दुरुस्तीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. बंधाऱ्याच्या १८ मोरी बांधणे व त्यावर स्लॅब टाकण्याचे काम सव्वादोन वर्षांनी गेल्याच आठवड्यात पूर्ण झाले. त्यामुळे उशिरा का होईना शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. 

सातशे हेक्टरसाठी लाभ

बंदलगी बंधाऱ्याखाली दक्षिण सोलापुरातील बंदलगी, बोळकवठा, औराद, संजवाड, राजूर, अक्कलकोट तालुक्यातील लिंबीचिंचोळी व केगाव या गावातील ७०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. आता चार वर्षांनी या बंधाऱ्यात पाणी अडले जाणार आहे. त्यामुळे हे संपूर्ण क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com