धरणे-पाझर तलावांच्या दुरुस्तीसाठी ७ कोटी ६६ लाख रुपयांचा प्रस्ताव

धरणे-पाझर तलावांच्या दुरुस्तीसाठी ७ कोटी ६६ लाख रुपयांचा प्रस्ताव
धरणे-पाझर तलावांच्या दुरुस्तीसाठी ७ कोटी ६६ लाख रुपयांचा प्रस्ताव

रत्नागिरी : तिवरे (ता. चिपळूण) धरण फुटल्यानंतर जिल्हा परिषदेंतर्गत येणारी धरणे आणि पाझर तलावांच्या दुरुस्तीसाठीचा ७ कोटी ६६ लाख रुपयांचा प्रस्ताव जिल्हा नियोजनकडे पाठविण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जिल्हा नियोजन समितीकडे १३ धरणांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यात दापोलीमधील खेम धरणाच्या दुरुस्तीसाठी २ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हे धरण दुरुस्तीच्या कामासाठी पाटबंधारे विभागाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने चर्चाही झाली आहे.

खेम व्यतिरिक्त जिल्हा परिषदेच्या सोवेलीसाठी १५ लाख, बाणकोटसाठी १ कोटी २५ लाख, विन्हेसाठी १५ लाख, भालगावला १० लाख, मढाळ १० लाख, कुंभारखणी १० लाख, कोसुंब १० लाख असा खर्च अपेक्षित आहे. त्याचबरोबर केळवली निखरेवाडी ८ लाख, ठोसरवाडी ८ लाख असे तेरा प्रस्ताव नियोजनकडे पाठविण्यात आले आहेत. जलसंधारण विभागातील १५ पैकी ६ बंधारे-तलाव दुरुस्त करणे आवश्यक आहेत. त्यातील गोळपवाडी ३५ लाख, कशेळी ५ लाख, जुवाटी, परुळे व हर्दखळे प्रत्येकी ५ लाख खर्च होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com