दुधी अळिंबी लागवडीसाठी जागेची निवड, वाढीसाठी लागणारे माध्यम आणि वातावरण तसेच काडाचे निर्ज
ताज्या घडामोडी
काटेपूर्णाच्या कालव्यांची दुरुस्ती रखडली, पाण्याचा अपव्यय
यंदाच्या रब्बी हंगामासाठी काटेपूर्णा प्रकल्पातून कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले आहे. परंतु अनेक ठिकाणी कालव्यांची दुरुस्ती न झाल्याने हे पाणी शेतांमध्ये जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे.
अकोला : यंदाच्या रब्बी हंगामासाठी काटेपूर्णा प्रकल्पातून कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले आहे. परंतु अनेक ठिकाणी कालव्यांची दुरुस्ती न झाल्याने हे पाणी शेतांमध्ये जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. शिवाय कालव्यात असलेल्या गवत, झुडपांमुळे शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोचण्याची शक्यता नाही.
काटेपूर्णा प्रकल्प शंभर टक्के भरला असून, या प्रकल्प क्षेत्रातील लाभार्थी शेतकऱ्यांना रब्बीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी गेल्या काही वर्षांपूर्वी तयार केलेल्या कालव्यातून दिले जात आहे. परंतु हे कालवे अनेक ठिकाणी गवत, झाडाझुडूपांनी झाकले आहेत. पाणी सोडण्यापूर्वी संबंधितांनी कालवा दुरुस्ती करणे गरजेचे होते. परंतु या बाबत काहीही नियोजन केल्याचे दिसून येत नाही.
याचा फटका रब्बीत सिंचन करीत असलेल्या शेतकऱ्यांना बसत आहे.
देखभाल दुरुस्तीचा निधी आला त्यातील एकही रुपया खर्च केला नाही. यापेक्षा जास्त निधी पाहिजे अशी माहिती अधिकारी देतात. परंतु आम्ही महत्त्वाच्या ठिकाणी दुरुस्ती मागणी केली होती. त्याकडेही दुर्लक्ष केला गेले. ३२ पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून काम झाले असते तरी बऱ्यापैकी पाणी व्यवस्थापनाचे काम मार्गी लागले असते.
प्रतिक्रिया
एकीकडे विभागाकडे कर्मचारी नाही, निधीही नाही दुसरीकडे पाणी वापर संस्था तयार असताना त्याकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.
- मनोज तायडे, अध्यक्ष, पाणी वापर संस्था, कौलखेड जहाँगीर, जि. अकोला
- 1 of 1023
- ››