शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा : काँग्रेसचे राज्यपालांना निवेदन

केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी विषयक शेतकरी विरोधी असून ती तत्काळ रद्द करावीत, अशी मागणी काँग्रेसने सोमवारी (ता.२८) केली.
शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा : काँग्रेसचे राज्यपालांना निवेदन
शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा : काँग्रेसचे राज्यपालांना निवेदन

मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी विषयक शेतकरी विरोधी असून ती तत्काळ रद्द करावीत, अशी मागणी काँग्रेसने सोमवारी (ता.२८) केली. काँग्रेस नेत्यांनी यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन दिले.

कोणाशीही चर्चा न करता शेतकरी विरोधी कायदे लादणारे केंद्रातील भाजप सरकार हे जनसामान्यांचे, शेतकऱ्यांचे नसून फक्त सूट बूटवाल्यांचे आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केली. काँग्रेसने कृषी कायद्याविरोधात राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन दिले.

राज्यपालांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. केंद्राने घाई गडबडीत तीन शेतकरी विरोधी कृषी विधेयके मंजूर करून घेत लोकशाहीचा गळा घोटला आहे. हे शेतकऱ्यांना गुलामगिरीत लोटणारे विधेयक असून पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या कॉर्पोरेट मित्रांनाच याचा फायदा होणार आहे. विधेयक संशोधनासाठी संसदीय समितीकडे पाठवावे असा आमचा आग्रह होता. किमान पक्षी भाजपने मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करायला हवी होती पण त्यांनी ते ही केले नाही,असे चव्हाण म्हणाले.

२०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू असं मोदी म्हणाले होते. पण शेतकऱ्यांना सध्या हमीभावही मिळत नाही. हा काळा कायदा पुन्हा सरकारला पाठवून फेरविचार करायची मागणी आम्ही आज राज्यपालांकडे केली आहे. याबाबत केंद्राशी चर्चा करू असे आश्वासन राज्यपालांनी दिल्याची माहिती श्री. चव्हाण यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com