Agriculture news in Marathi Replace the power rotor within 3 hours; Otherwise action: Bacchu Kadu | Agrowon

वीज रोहित्र ४८ तासांत बदलून द्या; अन्यथा कारवाई ः बच्चू कडू

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

अकोला ः वीज रोहित्रांबाबत शेतकऱ्यांच्या असंख्य तक्रारी आहेत. रोहित्र बदलण्यासाठी पैसे भरून घेतले जातात. शेतकऱ्यांच्या अशा तक्रारी तातडीने थांबल्या पाहिजेत. ४८ तासांत वीज रोहित्र बदलून द्यावे. यामध्ये जे कोणी कामचुकारपणा करीत असतील त्यांच्याविरुद्ध कारवाई करा, असे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिले. 

येथे घेतलेल्या आढावा बैठकीत वीज वितरण कंपनीबाबत त्यांच्याकडे आलेल्या तक्रारींचा संदर्भ देत त्यांनी अधिकाऱ्याला सूचना केल्या. या वेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, विविध विभागप्रमुख, अधिकारी उपस्थित होते. 

अकोला ः वीज रोहित्रांबाबत शेतकऱ्यांच्या असंख्य तक्रारी आहेत. रोहित्र बदलण्यासाठी पैसे भरून घेतले जातात. शेतकऱ्यांच्या अशा तक्रारी तातडीने थांबल्या पाहिजेत. ४८ तासांत वीज रोहित्र बदलून द्यावे. यामध्ये जे कोणी कामचुकारपणा करीत असतील त्यांच्याविरुद्ध कारवाई करा, असे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिले. 

येथे घेतलेल्या आढावा बैठकीत वीज वितरण कंपनीबाबत त्यांच्याकडे आलेल्या तक्रारींचा संदर्भ देत त्यांनी अधिकाऱ्याला सूचना केल्या. या वेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, विविध विभागप्रमुख, अधिकारी उपस्थित होते. 

श्री. कडू पुढे म्हणाले, ग्रामीण भागात शेतकऱ्यांना वेळेत वीज रोहित्र बदलून देण्याची जबाबदारी ही वीज कंपनीची आहे. असे असतानाही यासाठी विलंब केला जातो. परिणामी शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होते. शेतकरी वारंवार तक्रारी करतात. रोहित्र आणण्यासाठी शेतकऱ्याला खर्च करण्यास सांगितले जाते. मुळात रोहित्र ४८ तासांत बदलून देण्याचा नियम आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रत्येकाला सूचना द्यावी. शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही, याकडे लक्ष दिले पाहिजे. 

शेतकऱ्याने रोहित्राबाबत अर्ज केल्यानंतर प्रत्येक टप्प्यावर सेवा हमी अधिनियमानुसार काय कारवाई केली, याची नोंद झाली पाहिजे. शेतकऱ्याने वायरमनला दिलेल्या अर्जावर कार्यालयाने किती वेळेत काम केले, अर्ज पुढे गेला नसेल तर कोणामुळे थांबला, जबाबदार कोण याची स्पष्ट नोंद घेतली पाहिजे. जे कोणी आडकाठी आणत असतील त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी. यापुढे वीजपुरवठा, रोहित्राबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी यायला नको. तातडीने व्यवस्थेत सुधारणा करा, अन्यथा माझ्या पद्धतीने कारवाई करेल, असा इशारा श्री. कडू यांनी दिला.


इतर ताज्या घडामोडी
गोरेगाव आणि देगावांतील शेतकऱ्यांच्या...अकोला  ः जिल्ह्यातील गोरेगाव व देगाव या दोन...
जळगाव जिल्ह्यात अर्ली केळी लागवड सुरूजळगाव  ः जिल्ह्यात यावल, रावेर, मुक्ताईनगर,...
...अखेर रुईखेड येथे हवामान केंद्र स्थापनअकोला  ः महावेध व हवामान आधारित फळपीक विमा...
चांदवड येथे शेतकरी संघटनेची कांदा परिषद...नाशिक  : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
गोंदिया : नुकसानग्रस्तांचे डोळे लागले...सडक अर्जुनी, गोंदिया  ः खरीप हंगामात अवकाळी...
जळगाव : किसान सन्मानच्या लाभाची...जळगाव ः शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या...
परभणी जिल्ह्यात नादुरुस्त बंधाऱ्यांमुळे...परभणी : जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे...
कर्जमुक्ती योजनेंतर्गत ७४६ शेतकऱ्यांचे...नाशिक : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
किसान सभेचे बिऱ्हाड आंदोलन मागेनाशिक  : दिंडोरी तालुक्यामध्ये गेल्या अनेक...
लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात हेक्‍टरी १०...उस्मानाबाद : दोन्ही जिल्ह्यातील कापूस व तुरीची...
पाणी सोडण्याविरुद्ध रेणा प्रकल्पस्थळी...रेणापूर, जि. लातूर : भंडारवाडी (ता. रेणापूर)...
वणवा नुकसानग्रस्तांना सिंधुदुर्ग ‘झेडपी...सिंधुदुर्ग : ‘‘वणव्यामुळे नुकसान झालेल्या...
सांगलीत ‘रोहयो’तून डाळिंब लागवडीला ‘...आटपाडी, जि. सांगली : पावणे दोन वर्षांत येथील...
पुणे जिल्ह्यात हरभऱ्याला रोग-किडीचा फटकापुणे ः रब्बी हंगामात वाफसा न झाल्याने अनेक...
नगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत...नगर ः अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची...
पीकविम्याची रक्कम लवकरच ः कृषिमंत्री...मुंबई ः राज्यातील शेतकऱ्यांना १५ ते २० दिवसांच्या...
सातारा जिल्ह्यात अडीच महिन्यांत केवळ ४४...सातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू...
मराठवाड्यातील दूध संकलनात घटऔरंगाबाद : मराठवाड्यातील दूध संकलनात गतवर्षी...
पहाटेच्या शपथविधीची विधानसभेत आठवणमुंबई ः देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी...
मराठवाडी धरणग्रस्तांनी बंद पाडले धरणाचे...ढेबेवाडी, जि. सातारा : ‘आधी पुनर्वसन मगच धरण’ या...