महागाई नियंत्रणासाठी रेपो दर 'जैसे थे' 

रेपो दराबाबत रिझर्व्ह बँकेने काहीही बदल न करता आहे तेच कायम ठेवले आहेत. रेपो दर ४ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला असून रिव्हर्स रेपो दर ३.३ टक्क्यांवरच कायम ठेवण्यात आला आहे.
das
das

मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पतधोरण गुरुवारी जाहीर केले. यावेळी रेपो दराबाबत रिझर्व्ह बँकेने काहीही बदल न करता आहे तेच कायम ठेवले आहेत. रेपो दर ४ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला असून रिव्हर्स रेपो दर ३.३ टक्क्यांवरच कायम ठेवण्यात आला आहे. महागाईचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

दरम्यान, येत्या काळात देशाचा आर्थिक विकासदर उणे राहण्याची शक्यता आहे. चांगल्या पावसामुळे खरीप पेरणीत वाढ झाली आहे, असेही त्यांनी सांगितले. 

गुरुवारी रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण जाहीर करण्यात आले. या पतधोरणात रेपो दराबाबत रिझर्व्ह बँक काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले होते. आरबीआयने व्याज दरात कोणताही बदल केला नाही. बँकेने व्याज दरात कोणताही बदल केला नसला तरी या वर्षात लॉकडाऊनचा विचार करता दोन वेळा व्याज दरात १.१५ टक्के इतकी कपात केली होती. 

एप्रिल महिन्याच्या तुलनेत देशाच्या अर्थव्यवस्थेत थोडी सुधारणा झालेली दिसून येत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे २०२० च्या पहिल्या सहामाहीत जागतिक अर्थव्यवस्थेत मोठी घरसण झाली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयातीवरही मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. तसेच जगभरातील उत्पादन आणि सेवा क्षेत्रालाही याचा मोठा फटका बसला आहे. येत्या काळात कोविड-१९ची लस उपलब्ध झाल्यास चित्र बदलण्याची शक्यता आहे, असे मत शक्तीकांत दास यांनी व्यक्त केले. 

ते पुढे म्हणाले की, वैयक्तिक व कॉर्पोरेट कर्जाची पुनर्रचना करण्यासाठी आरबीआयने बँकांना परवानगी दिली आहे. ही योजना पुनर्रचना एकखिडकीमधून राबविण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या परिणामातून कर्जदारांना दिलासा मिळणार असल्याचे शक्तिकांत दास यांनी सांगितले. 

एनएचबी आणि नार्बाडला अतिरिक्त १० हजार कोटींचा वित्तपुरवठा करणार असल्याचे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले. जूनमध्ये आयातीत मोठी घसरण झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या व पूर्ण तिमाहीत रिअल जीडीपीत घसरण होऊन उणे राहणार असल्याचे शक्तिकांत दास यांनी सांगितले. 

मागील दोन तिमाही पतधोरणात आरबीआयने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी लवचीक पतधोरण स्वीकारले होते. या धोरणातून रेपो दरात कपात देत कपात करुन मागणी व अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा आरबीआयने प्रयत्न केला आहे. 

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मे महिन्यात रेपो दरात ४० बेसिस पॉईंटने कपात केली होती. त्यामुळे रेपो दर हा ४.४ टक्क्यांवरून ४ टक्के झाला आहे. अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने वाढत असताना आणि मंदीची भीती असल्याने आरबीआयने मार्च आणि मे २०२० मध्ये रेपो दरात कपात केली होती. रिव्हर्स रेपो दरातही कपात करण्यात आली होती. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com