'आर्यन'वरील कारवाईसाठी सहकार विभागाला अहवाल

Report to the Co-operation Department for Action on 'Aryan'
Report to the Co-operation Department for Action on 'Aryan'

सोलापूर : ‘‘बार्शी तालुक्‍यातील आर्यन शुगरकडे प्रलंबित असलेले पैसे शेतकऱ्यांना तत्काळ मिळावेत, न्यायालयात सुरू असलेल्या याचिकांवर शासनाच्या वतीने पाठपुरावा करावा, यांसह आर्यन शुगरच्या माहितीचा सविस्तर अहवाल राज्याच्या सहकार विभागाला पाठविणार आहे,’’ अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

आर्यन शुगरने पाच एकर जमिनीवर कारखान्याचा परवाना आणि जिल्हा बॅंकेचे १२० कोटी रुपयांचे कर्ज मिळविले कसे, कारखान्याला परवाना देणाऱ्या सहकार विभागातील अधिकाऱ्यांवर आणि कर्ज देणाऱ्या जिल्हा बॅंकेच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी जनहित शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. या मागणीवर नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांची बैठक घेतली. 

आर्यन शुगर हा खासगी साखर कारखाना कुमदा उद्योग समूहाकडे ५०० रुपयांच्या स्टॅम्पवर हस्तांतरित करण्यात आला आहे. या व्यवहारात कारखान्याने लाखो रुपयांचे मुद्रांक शुल्क चुकविले असल्याचे जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी या बैठकीत निदर्शनास आणून दिले.

कारखान्याची मालमत्ता लिलावात काढा

आर्यन शुगरच्या माध्यमातून हजारो शेतकरी, ऊसतोडणी कामगार, वाहतूकदार यांचे कष्टाचे पैसे अडकले आहेत. जिल्हा प्रशासन या प्रश्‍नावर कारवाई करत नाही. आम्ही आंदोलने केली, मोर्चे काढले तरीही दखल घेत नाही. सर्वसामान्यांचे कर्ज थकीत असल्यास त्याची मालमत्ता लिलावात काढता? मग बड्या लोकांनी कर्ज थकविल्यानंतर त्यांची मालमत्ता लिलावात का काढत नाहीत? न्याय आणि कायदा हा सर्वांना सारखा असावा, असेही देशमुख या बैठकीत म्हणाले. त्यावर यासंबंधी योग्य ती कार्यवाही केली जाईल. मुद्रांक शुल्काच्या विषयासह अन्य सविस्तर अहवाल सहकार विभागाला पाठवण्यात येणार असल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com