agriculture news in marathi, Report criminal cases against banks, if refuse the loan : Rajendra Bhosale, collector | Agrowon

कर्ज नाकारणाऱ्या बॅंकांवर गुन्हे नोंदवू : जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले
टीम अॅग्रोवन
बुधवार, 19 जून 2019

सोलापूर : खरीप हंगामात किती शेतकऱ्यांना कर्जवाटप केले, याची माहिती देण्यासाठी राष्ट्रीय, व्यापारी व खासगी बॅंका टाळाटाळ करत आहेत. आतापर्यंत किती शेतकऱ्यांना कर्जवाटप केले आहे, याची माहिती द्या. शेतकऱ्यांना खरिपासाठी वेळेत पीककर्जवाटप केले नाही, कर्जे नाकारली तर फौजदारी गुन्हे दाखल करू, अशा शब्दांत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सोमवारी (ता. १७) बॅंकांच्या प्रतिनिधींना ताकीद दिली. 

सोलापूर : खरीप हंगामात किती शेतकऱ्यांना कर्जवाटप केले, याची माहिती देण्यासाठी राष्ट्रीय, व्यापारी व खासगी बॅंका टाळाटाळ करत आहेत. आतापर्यंत किती शेतकऱ्यांना कर्जवाटप केले आहे, याची माहिती द्या. शेतकऱ्यांना खरिपासाठी वेळेत पीककर्जवाटप केले नाही, कर्जे नाकारली तर फौजदारी गुन्हे दाखल करू, अशा शब्दांत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सोमवारी (ता. १७) बॅंकांच्या प्रतिनिधींना ताकीद दिली. 

खरीप हंगामात जिल्ह्यातील बॅंकांनी वाटप केलेल्या कर्जाचा आढाव्यासाठी, पुढील नियोजनासाठी बॅंकर्स प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. गैरहजर असलेल्या प्रतिनिधींनी पुढील बैठकांना येताना त्यांच्या विभागीय व्यवस्थापकाला घेऊन यावे, अशी सूचना नोटिशीद्वारे देण्यात येणार आहे. गैरहजर असलेल्या बॅंकांची बैठक आता २० जूनला बोलविण्यात आली आहे. 

कर्जवाटप वाढवा; अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशाराच जिल्हाधिकारी भोसले यांनी दिला. वेळेत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबविली जाते. या योजनेतून शेतकऱ्यांना लाभ मिळावा, यासाठी आयसीआयसीआय बॅंकेच्या वतीने प्रस्ताव सादर करण्यात आले नाहीत. लाभार्थी असतानाही तुम्ही प्रस्ताव सादर का केले नाहीत, असा खुलासा बॅंकेने द्यावा, असेही जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले. 

केंद्र व राज्य सरकारच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या विविध निराधार योजना, पेन्शन योजना याबाबत किती रक्कम दरमहा जमा होते, किती रक्कम शिल्लक आहे, किती लाभार्थींची रक्कम परत जाते, याबाबतची माहिती तीन दिवसांत द्या, अन्यथा याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करू, असा इशाराही डॉ. भोसले यांनी दिला.

इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...