agriculture news in Marathi, report of HT seed committee in last stage, Maharashtra | Agrowon

एच.टी. कापूस बियाणे समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

नागपूर ः राज्यात अनधिकृतपणे लागवड होणाऱ्या एच.टी. (हर्बीसाईड टॉलरंट) बियाण्यांची पाळेमुळे खोदण्यासाठी राज्य सरकारने विशेष चौकशी समितीची (एसआयटी) नियुक्‍ती केली होती. सदर समितीने देशभरात फिरून अनेकांची चौकशी केली. त्यानंतर आता शासनाला सादर करण्यासाठीच्या अहवालाला अंतिम रूप दिले जात आहे. त्याकरिता गेल्या तीन दिवसांपासून समिती सदस्य वनामतीमध्ये ठाण मांडून आहेत. 

नागपूर ः राज्यात अनधिकृतपणे लागवड होणाऱ्या एच.टी. (हर्बीसाईड टॉलरंट) बियाण्यांची पाळेमुळे खोदण्यासाठी राज्य सरकारने विशेष चौकशी समितीची (एसआयटी) नियुक्‍ती केली होती. सदर समितीने देशभरात फिरून अनेकांची चौकशी केली. त्यानंतर आता शासनाला सादर करण्यासाठीच्या अहवालाला अंतिम रूप दिले जात आहे. त्याकरिता गेल्या तीन दिवसांपासून समिती सदस्य वनामतीमध्ये ठाण मांडून आहेत. 

केंद्र सरकारने मोन्सॅटोला कपाशी पिकात एच.टी. सीड चाचणीसाठी परवानगी दिली होती. चाचणी सुरू असतानाच कंपनीकडून भारतातून हे तंत्रज्ञान विड्रॉल (मागे घेत) करीत असल्याची घोषणा करण्यात आली. त्यापूर्वी कंपनीने देशातील अनेक राज्यात चाचण्या घेतल्या. त्याअंतर्गत एच.टी. तंत्रज्ञानाचा अंतर्भाव असलेले बियाणे मोठ्या प्रमाणात बिजोत्पादित करण्यात आले. हे बियाणे नष्ट केल्याचा दावा कंपनी करीत आहे. परंतू त्यानंतरही तेलंगणा, आंध प्रदेश, गुजरात राज्यात अनधिकृतपणे बिजोत्पादन करीत एच.टी. बियाणे उपलब्ध करून देण्यात आले. 

हे बियाणे उपलब्ध व्हावे याकरिता गावपातळीवर शेतकऱ्यांचाच एजंट म्हणून वापर केला गेला. त्यामुळे या साखळीतील बियाण्यांचे मुख्य सूत्रधार मोकाट राहिले आणि शेतकऱ्यांवरच कारवाई झाली. पर्यावरणावर याचे परिणाम होत असल्याने राज्य सरकारने राज्यात एच.टी. बियाण्यांचा पुरवठा करणाऱ्या साखळीचा शोध सुरू केला. त्याकरिता विशेष पोलिस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांच्या अध्यक्षतेत दोन सदस्यीय विशेष चौकशी समितीचे गठण करण्यात आले. कृष्णप्रकाश अध्यक्ष तर अमरावती विभागीय कृषी सहसंचालक प्रकाश नागरे हे समितीचे सचिव आहेत.

समितीचा कालावधी संपला असला तरी कृष्णप्रकाश यांच्या कामाच्या व्यस्ततेमुळे चौकशी अहवाल गेल्या वर्षभरात तयार होऊ शकला नव्हता. त्याला नागपुरातील तीन दिवसीय बैठकीत अंतिम रूप दिले जाणार आहे. समितीने एच.टी. सीड नियंत्रणासाठी काही शिफारशीदेखील अहवालात केल्या असून नव्या सरकारच्या स्थापनेनंतर हा अहवाल सादर केला जाईल. संकेतस्थळाच्या माध्यमातून हा अहवाल सार्वजनिक केला जाण्याची शक्‍यतादेखील वर्तविली जात आहे. 

भारतीय कृषी संशोधन परिषदेतही चौकशी
 बुधवार(ता. ९)पासून समितीची वनामतीत बैठक सुरू आहे. पहिल्या दिवशी राज्यातील सर्व पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यांनी दाखल केलेले एच.टी. सीडविषयक गुन्हे, तपासातील बाबी यावर चर्चा झाली. दुसऱ्या दिवशी (ता. १०) गुजरात व राज्याच्या इतर भागातील अवैधरीत्या होणारे बिजोत्पादन यावर मंथन झाले. कोणत्याही तंत्रज्ञानात कृषी संशोधकांचा सहभाग असतोच तो धागा पकडत दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन परिषदेत जात तेथेदेखील कृष्णप्रकाश यांच्या नेतृत्वातील समितीने झाडाझडती घेतल्याची माहिती आहे.

इतर अॅग्रो विशेष
महाबळेश्वरात स्ट्रॉबेरी लागवडीस वेगसातारा  ः जिल्ह्यातील महाबळेश्वर, जावळी, वाई...
संत्र्याच्या आंबिया बहराला गळती; भाव...अकोला : संत्र्याच्या आंबिया बहाराला गळती...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः परतीचा मॉन्सून देशातून परतल्यानंतर...
दुधाचे थकीत अनुदान देण्याच्या हालचालीपुणे: राज्यातील डेअरी उद्योगांचे अडकलेले...
अमरावती विभागात सोयाबीन उत्पादकता घटलीअमरावती  ः गेल्या काही वर्षांत कापसाला...
‘महाॲग्री ते महाॲग्रीटेक’ एक स्वप्नरंजन राज्यात शेतकऱ्यांची सर्व कामे ऑनलाईन होतील असे एक...
शेण पावडरपासून कलात्मक वस्तूंची...सुमारे ३८ देशी गायींचे संगोपन करीत नागपूर येथील...
शेततळ्यातील पाण्यावर फुलले शेडनेटमधील...पावसाचे कायम दुर्भिक्ष, त्यामुळे शेती अर्थकारणाला...
राज्यात गाजर ११०० ते ८००० रुपये...जळगावात ११०० ते १८०० रुपये दर जळगाव कृषी...
ऋतुचक्र बदलया वर्षीचा मॉन्सून अनेक बाबींनी वैशिष्ट्यपूर्ण...
प्रतिष्ठेचं वलय होतंय द्राक्ष...द्राक्ष शेतीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय...
उडीद, मूग, सोयाबीन ऑनलाइन नोंदणीला...औरंगाबाद: हमीदराने उडीद, मूग, सोयाबीन...
सांगली जिल्ह्यात डाळिंबावर रसशोषक...सांगली : मृग हंगाम धरलेल्या बहाराच्या डाळिंबाच्या...
कडधान्य आयातीला मुदतवाढीचा प्रस्तावनवी दिल्लीः देशात यंदा खरिप काडधान्य पिकांची...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे: वाढलेल्या उन्हामुळे राज्यात चटका वाढला आहे...
परतीचा मॉन्सून आठ दिवसात माघारीपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
आदर्श वनसंवर्धनातून ग्रामविकास साधलेले...वनसंपत्तीचे संवर्धन, वनविकासासह शेतीतही दिशादर्शक...
येतो मी... मॉन्सूनने घेतला देशाचा निरोप...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी...
शेतकऱ्यांच्याच कपाळावर पुन्हा ‘मिऱ्या’दिनांक ३ जुलै २०१९ रोजी केरळचे खासदार डीन...
आश्वासनांचा पाऊसराज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम...