प्रयोगशील शेतीची आखणी अन् सोबतीला लेखणी  

सामाजिक प्रश्नांचा आढावा घेत बातमीतून मांडणी, अशी दुहेरी कामे शेतकरी आणि पत्रकार असलेले सुनील खैरनार अत्यंत आदर्शवत पार पाडतात.
reporter
reporter

नाशिक : सकाळी चार वाजेपासून त्यांचा दिवस सुरू होतो. सकाळी आठ वाजेपर्यंत वर्तमानपत्रांचे वितरण, पुन्हा लगेच शेताला फेरफटका मारून शेतीकामाचे नियोजन अन् पुन्हा चौकस नजर ठेवून सामाजिक प्रश्नांचा आढावा घेत बातमीतून मांडणी, अशी दुहेरी कामे शेतकरी आणि पत्रकार असलेले सुनील खैरनार अत्यंत आदर्शवत पार पाडतात. `प्रयोगशील शेतीची आखणी अन् समाजासाठी सोबतीला लेखणी' असा प्रवास त्यांचा सुरू आहे.  सटाणा तालुक्यातील लखमापूर हे शेतीच्या अनुषंगाने प्रगतशील गाव म्हणून जिल्हाभरात ओळखलं जातं. याच गावात सुनील खैरनार वृत्तपत्र वितरण करण्यासह बातमीदारी करतात. ग्रामविकास, सहकार, शिक्षण, राजकारण आणि स्थानिक प्रश्नांची जाण असल्याने सर्वसामान्यांचे प्रश्न ते सातत्याने मांडत असतात. उदरनिर्वाहासाठी शेती हे त्यांचे शाश्वत साधन. मुळात पत्रकारिता करताना दिवस कधी जातो याचा पत्ता लागत नाही.  पंचक्रोशीतील नागरिकांशी जनसंपर्क ठेऊन शेतीही उत्तमरीत्या करणे हे त्यांचे वैशिष्ट्य. गेल्या पाच वर्षांपासून नावीन्यपूर्ण शेती करताना शेतीत यांत्रिकीकरण, संपूर्ण क्षेत्रावर सुक्ष्म सिंचन, जैविक निविष्ठांचा अधिक वापर आणि गरजेनुसार रासायनिक खतांचा वापर असे त्यांचे शेती नियोजन असते. सध्या कोबी हे त्यांचे मुख्य पीक आहे. अलीकडेच दीड एकरवर ३८ क्विंटल उत्पादन घेऊन प्रतिकिलो १५ रुपये विक्री केली. यातून त्यांना ४.५ लाखांचे उत्पन्न मिळाले. हवामान बदलाचा फटका शेतीला बसतो, मात्र गुणवत्तापूर्ण उत्पादन घेतल्याने सरासरी ७ लाखांपर्यंत उत्पन्न मिळते असे त्यांनी सांगितले. अडचणींवर मात करून पुढे जाण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असतो. कादा लागवडीसाठी मजूर मिळत नाही म्हटल्यावर यंदा त्यांनी कांदा पेरणी करून या समस्येवर मात केली. त्यांना आई व भावाची मोठी मदत तर मिळते. सकाळी ७ वाजेपासून तर रात्री ८ वाजेपर्यंत त्यांची शेतीकामे सुरू असतात.

दृष्टीक्षेपात शेती 

  • एकूण शेती ः ५ एकर
  • एकूण बटाई पद्धतीने शेती ः ५ एकर
  • भाजीपाला पिके ः कोबी, हिरवी मिरची, शिमला मिरची, फ्लॉवर, कांदा, टोमॅटो
  • फळपिके ः टरबूज, खरबूज, पपई
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com