पांगरीत पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी फोन उचलेना

पांगरी, ता. बार्शी ः शेतकरी पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यांच्याकडून फोन उचलला जात नाही. उचलला तर केवळ टोलवाटोलवी केली जात आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.
The representative of Pangrit Crop Insurance Company did not pick up the phone
The representative of Pangrit Crop Insurance Company did not pick up the phone

पांगरी, ता. बार्शी ः पीक नुकसानीची तक्रार केलेल्या शेतकऱ्यांची पहिली नावांची यादी जाहीर झाली आहे. मात्र त्यात अनेक शेतकऱ्यांची नावे नाहीत. त्यासाठी शेतकरी पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यांच्याकडून फोन उचलला जात नाही. उचलला तर केवळ टोलवाटोलवी केली जात आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.

सोयाबीन काढणी, मळणीचा खोळंबा

सततच्या पावसाने शेतकऱ्यांच्या सोयबीनची काढणी खोळंबली आहे. तर अनेकांनी सोयाबीन गंज करून ताडपत्रीखाली झाकून ठेवले आहे. त्याची मळणी करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे.  दुसरीकडे नुकसानीचे पंचनामे शासनाकडून सुरु आहेत. त्यासाठी कागदपत्रे गोळा करण्यासाठी शेतकरी धावपळ करीत आहेत.

विमा कंपनीच्या प्रतिनिधींची बैठक बोलवून माहिती घेतो. त्यांना योग्य त्या सूचना देण्यात येतील. - शहाजी कदम, तालुका कृषी अधिकारी, बार्शी.

चिंचोलीत वीज पडून बैलाचा मृत्यू

चिंचोली (ता. बार्शी) परिसरात नुकत्याच मुसळधार झालेल्या पावसात वीज अंगावर पडून बैलाचा मृत्यू झाला. अनिल विठ्ठल शिंदे (रा. चिंचोली) यांच्या मालकीचा हा बैल होता. शनिवारी (ता.९) दुपारी अचानक विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसास सुरवात झाली. थोड्याच वेळात नदी -नाल्यांना पूर आला. या कालावधीत विजेचा कडकडाट चालूच होता.

शेतकरी शिंदे यांनी शेतात दोन बैल बांधले होते. त्यातील एक बैलाच्या अंगावर वीज पडली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे शिंदे यांचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. तलाठी विनोद मुंढे यांनी तहसीलदारांना या नुकसानीची तत्काळ माहिती दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com