Agriculture news in marathi, The representative of Pangrit Crop Insurance Company did not pick up the phone | Agrowon

पांगरीत पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी फोन उचलेना

टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 ऑक्टोबर 2021

पांगरी, ता. बार्शी ः शेतकरी पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यांच्याकडून फोन उचलला जात नाही. उचलला तर केवळ टोलवाटोलवी केली जात आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.

पांगरी, ता. बार्शी ः पीक नुकसानीची तक्रार केलेल्या शेतकऱ्यांची पहिली नावांची यादी जाहीर झाली आहे. मात्र त्यात अनेक शेतकऱ्यांची नावे नाहीत. त्यासाठी शेतकरी पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यांच्याकडून फोन उचलला जात नाही. उचलला तर केवळ टोलवाटोलवी केली जात आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.

सोयाबीन काढणी, मळणीचा खोळंबा

सततच्या पावसाने शेतकऱ्यांच्या सोयबीनची काढणी खोळंबली आहे. तर अनेकांनी सोयाबीन गंज करून ताडपत्रीखाली झाकून ठेवले आहे. त्याची मळणी करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे. 
दुसरीकडे नुकसानीचे पंचनामे शासनाकडून सुरु आहेत. त्यासाठी कागदपत्रे गोळा करण्यासाठी शेतकरी धावपळ करीत आहेत.

विमा कंपनीच्या प्रतिनिधींची बैठक बोलवून माहिती घेतो. त्यांना योग्य त्या सूचना देण्यात येतील.
- शहाजी कदम, तालुका कृषी अधिकारी, बार्शी.

चिंचोलीत वीज पडून बैलाचा मृत्यू

चिंचोली (ता. बार्शी) परिसरात नुकत्याच मुसळधार झालेल्या पावसात वीज अंगावर पडून बैलाचा मृत्यू झाला. अनिल विठ्ठल शिंदे (रा. चिंचोली) यांच्या मालकीचा हा बैल होता. शनिवारी (ता.९) दुपारी अचानक विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसास सुरवात झाली. थोड्याच वेळात नदी -नाल्यांना पूर आला. या कालावधीत विजेचा कडकडाट चालूच होता.

शेतकरी शिंदे यांनी शेतात दोन बैल बांधले होते. त्यातील एक बैलाच्या अंगावर वीज पडली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे शिंदे यांचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. तलाठी विनोद मुंढे यांनी तहसीलदारांना या नुकसानीची तत्काळ माहिती दिली.

 


इतर ताज्या घडामोडी
शेततळ्याच्या अनुदानासाठी नगरला सर्वाधिक...नगर ः नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या...
कृषिपंपांची वीजतोडणी मोहीम तत्काळ...हिंगणा, जि. नागपूर : महावितरण कंपनीने कृषिपंपाचे...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत...जलालखेडा, जि. नागपूर : खरीप हंगाम सन २०२१-२२ ला...
अर्धापूर भागात केळीवर रोटावेटर; रोग,...नांदेड : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे...
लाच घेताना पेठ तालुका कृषी अधिकाऱ्यास...नाशिक : कृषी सेवा केंद्राच्या परवान्याचे नूतनीकरण...
कृषिमंत्र्यांच्या तालुक्याची अतिवृष्टी...नाशिक: जिल्ह्यात ऑगस्ट-सप्टेंबर २०२१ दरम्यान...
यवतमाळ : पाणंद रस्त्यांची मोहीम अर्धवटयवतमाळ : शेतकऱ्यांच्या दृष्टीने पाणंद रस्ते अतिशय...
सोलापूर जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या...सोलापूर ः जिल्ह्याच्या विविध भागांतील...
सोलापूर जिल्ह्यात फळपीक विम्याचा लाभ...सोलापूर : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत...
खानदेशात रब्बी पिकांची पेरणी २०...जळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामातील पिकांची...
सोंडलेचा १७० कोटींचा निवाडा मंजूरचिमठाणे, जि. धुळे : शिंदखेडा व धुळे तालुक्यांना...
जळगाव जिल्ह्यात भरडधान्य खरेदी योजनेचा...जळगाव ः जिल्ह्यात भरडधान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांना...
लासलगांव बाजार समितीत शेतमाल तारण कर्ज...नाशिक : निफाड तालुक्यात मका व सोयाबीन काढणीचे काम...
मेशी येथे आधारभूत खरेदी किंमतकडे...मेशी, ता. देवळा : आधारभूत किंमत खरेदी योजनेतर्गत...
गावकऱ्यांच्या श्रमामुळे ‘पद्मश्री’ :...नगर : ‘‘राजकारणापासून दूर राहून गावाच्या विकासावर...
‘स्वाभिमानी’च्या आंदोलनाची १७ ला...बुलडाणा : कापूस-सोयाबीन उत्पादकांचे प्रश्‍न,...
बारावीच्या परीक्षेसाठी आजपासून अर्ज...मुंबई : राज्य शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च...
जर्मनीत कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढले बर्लिन: जगभरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत...
मुंबईत गुरुवारी २८३ नवे कोरोना रुग्ण; २...मुंबई : बुधवारच्या तुलनेत मुंबईत कोविड बाधित...
चेन्नई पुन्हा जलमय; अतिवृष्टीचा जबर...चेन्नई ः तमिळनाडूवर अतिवृष्टीचे संकट घोंघावू...