नगरला चिंच प्रतिक्विंटल ८३०० ते ११९०० रुपये

नगरला चिंच प्रतिक्विंटल ८३०० ते ११९०० रुपये
नगरला चिंच प्रतिक्विंटल ८३०० ते ११९०० रुपये

नगर ः नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भुसार मालाच्या आवकेत काहीसा परिणाम झालेला दिसत आहे. मात्र, चिंचेची आवक जोरात आहे. बाजार समितीत गेल्या आठवड्यात चिंचेची सहा हजार सातशे ५३ क्विंटलची आवक झाली आणि प्रतिक्विंटल ८३०० ते ११९०० रुपये दर मिळाला. रब्बीची ज्वारीचे पीक हाती आले असले तरी बाजारात मात्र ज्वारीची फारशी आवक होताना दिसत नाही. 

बीड, सोलापूरसह मराठवाड्याच्या बऱ्याच भागात चिंच विक्रीला बाजारपेठ उपलब्ध नसल्याने त्या भागातून नगर बाजार समितीतच चिंचेची आवक होत असते. त्यामुळे आठवडाभरात चिंचेची आवक वाढली आहे. गावराण ज्वारीचे पीक हाती आले असतानाही बाजारात फारशी आवक झालेली नाही. 

गेल्या आठवडाभरात नगर बाजार समितीत २१२ क्विंटल ज्वारीची आवक झालेली असून २२०० ते २६०० रुपये दर मिळाला. बाजरीची ४९ क्विंटलची आवक झाली व १७५१ रुपये दर मिळाला. तुरीची १३१ क्विंटलची आवक झाली व ४७४९ ते ५००० रुपये दर मिळाला.

हरभऱ्याची ५३ क्विंटलची आवक होऊन ३४०० ते ४०७५ रुपये दर मिळाला. तर गव्हाची १७२ क्विंटलची आवक होऊन २१०० ते २१५० रुपये दर मिळाला. सोयाबीनची २८ क्विंटलची आवक झाली आणि २००० ते ३५१५ रुपये दर मिळाला. गुळाची १२०० क्विंटलची आवक झाली आणि ४००० ते ५१५१ रुपये दर मिळाला. तर लाल मिरचीची ६५ क्विंटलची आवक होऊन ७५०० ते ९१०० रुपये दर मिळाला, असे बाजार समितीतून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com