कापूस पिकाचा विमा नुकसान यादीत समावेश करा : शेतकरी संघटना

जळगाव जामोदच्या तहसीलदारांना शेतकरी संघटनेचे निवेदन
जळगाव जामोदच्या तहसीलदारांना शेतकरी संघटनेचे निवेदन

बुलडाणा ः जिल्ह्यात कापूस पीक मोठ्या क्षेत्रावर पेरले जात असून या पिकाचा विमा नुकसान यादीत समावेश करावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश बानाईत यांनी जळगाव जामोद तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत निवेदनात म्हटले, की दुष्काळाच्या झळा सहन करीत असताना बुलडाणा जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला आहे. अशाही परिस्थितीमध्ये मागील हंगामात शेतकऱ्यांनी पैशांची जुळवाजुळव करून विविध पिकांचा विमा काढला. पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत हे पैसे भरले. मागील वर्षी अत्यंत कमी पाऊस झाला. जिल्ह्यामध्ये सर्वच पिके हातातून गेली. हे सरकारलाही माहिती आहे. त्यामुळेच बुलडाणा जिल्ह्यातील ९० महसूल मंडळांपैकी ८८ महसूल मंडळांचा समावेश दुष्काळग्रस्त यादीमध्ये करण्यात आला. संपुर्ण जिल्ह्यातील परिस्थिती शासन जाणून असताना, काही पिकांचा समावेश पीकविम्यात व्हावा व काही पिकांना त्या विम्याच्या यादीत स्थान मिळू नये, ही बाब हास्यास्पद वाटत आहे. याच हंगामात पेरलेली पिके पाण्याअभावी वाया गेली असतील तर कापसाच्या पिकाचेही नुकसान झाले हे स्पष्ट आहे. मात्र, अधिकारी पैसेवारी व पीकविम्याचे निकष वेगळे असल्याचे सांगत आहेत. बुलडाणा जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या जास्त असून, पेरा पण जास्त केला जातो. कापूस पिकांचा समावेश पीकविम्यात व्हावा, असे वाटत असल्याचे श्री. बानाईत यांनी म्हटले आहे. शासनाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा नुकसानभरपाई यादीत समावेश करावा, अशी मागणी जळगाव जामोद तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. या वेळी श्रीराम मिसाळ, अनंत बकाल, सुनील गवई, रामदास बोरसे, रवींद्र तायडे, गजानन देशमुख यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com