agriculture news in marathi, research of Agriculture university now on one click, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

कृषी विद्यापीठांचे संशोधन आता एका क्लिकवर

मारुती कंदले
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

मुंबई ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी केलेले संशोधन आता डिजिटल स्वरूपात वेबसाइटवर झळकणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हव तेव्हा संशोधनाशी निगडित सर्व गोष्टी अगदी घरबसल्या ऑनलाइन पाहता येणार आहेत. सध्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने यात बाजी मारली असून, उर्वरित तिन्ही कृषी विद्यापीठांना त्यासाठी निश्चित कालमर्यादा घालून देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच त्यांची संशोधनेसुद्धा संबंधित विद्यापीठांच्या वेबसाइटवर उपलब्ध होतील, असे मंत्रालयातील उच्चपदस्थांनी स्पष्ट केले. 

मुंबई ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी केलेले संशोधन आता डिजिटल स्वरूपात वेबसाइटवर झळकणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हव तेव्हा संशोधनाशी निगडित सर्व गोष्टी अगदी घरबसल्या ऑनलाइन पाहता येणार आहेत. सध्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने यात बाजी मारली असून, उर्वरित तिन्ही कृषी विद्यापीठांना त्यासाठी निश्चित कालमर्यादा घालून देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच त्यांची संशोधनेसुद्धा संबंधित विद्यापीठांच्या वेबसाइटवर उपलब्ध होतील, असे मंत्रालयातील उच्चपदस्थांनी स्पष्ट केले. 

शासकीय कारभार, सेवा ऑनलाइन, पारदर्शक असाव्यात याकडे राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांचा कल आहे. त्यासोबतच कृषी विद्यापीठांचे संशोधन शेतकऱ्यांना घरबसल्या चोवीस तास ऑनलाइन उपलब्ध असावे, यासाठी ते आग्रही आहेत. नाशिकचे विभागीय आयुक्त असतानाही त्यांनी याकामी पुढाकार घेतला होता. मात्र, त्यावेळी विद्यापीठांच्या स्तरावरील उदासीनतेमुळे डिजिटलीकरणाला मूर्त स्वरूप येण्यास अपेक्षित सहकार्य मिळाले नव्हते.

आता कृषी खात्याच्या सचिवपदाची धुरा स्वीकारल्यानंतर सचिव श्री. डवले यांनी पुन्हा या कामाला गती देण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे या मुद्द्यावर इतके दिवस चालढकल करणाऱ्या विद्यापीठांना नाईलाजाने का असेना डिजिटलीकरणास सुरवात केली आहे. काही विद्यापीठांना ही संकल्पना आवडली, त्यांनी तातडीने या कामाला सुरवात केली. मात्र, काहींमध्ये अद्यापही निरुत्साह असल्याचे दिसून येत आहे. 

राज्यात महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी (जि. अहमदनगर), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, (जि. अकोला), मराठवाडा कृषी विद्यापीठ, (जि. परभणी) आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, (जि. रत्नागिरी) ही चार कृषी विद्यापीठे आहेत. या विद्यापीठांनी विविध जातींच्या शेकडो वाणांचे संशोधन केले आहे. पशूंच्या संशोधनाचाही यात समावेश आहे. कृषी तसेच पूरक क्षेत्रात कार्यरत खासगी कंपन्या, संस्था स्वतःच्या संशोधनांची माहिती डिजिटल स्वरूपात वेबसाइटवर झळकावून त्याचे प्रभावीपणे मार्केटिंग करतात.

मात्र, कृषी विद्यापीठांच्या संशोधनाशी निगडित कोणतीच माहिती वेबसाइटवर एका क्लिकसरशी एकसंघ पाहायला मिळत नाही, ही उणीव ओळखून हे काम हाती घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. प्रशासकीय पातळीवरूनही आतापर्यंत याअनुषंगाने कधी विचारणा झाली नसल्याने विद्यापीठांनीही स्वतःहून त्यासाठी पुढाकार घेतला नव्हता. मात्र, आता मंत्रालय स्तरावरूनच दट्ट्या आल्याने विद्यापीठांनी हालचाली सुरू केल्या आहेत. 

त्यामुळे केवळ संबंधित विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रातील नव्हे, तर राज्याच्या कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांना अगदी घरबसल्या विद्यापीठांच्या संशोधनाची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. या माहितीचा वापर लागवडीसोबतच पीक व्यवस्थापन आदी बाबी समजून घेण्यासाठी शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार आहे. येत्याकाळात उर्वरित तीन कृषी विद्यापीठांचेही सगळे संशोधनही शेतकऱ्यांना ऑनलाइन एका क्लिकवर पाहायला मिळेल, अशी आशा आहे. 

शेतकऱ्यांनाही माहिती मिळणार
दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने वेबसाइटवर संशोधन या माहितीखाली पीकनिहाय संशोधन तसेच पीकनिहाय शिफारशींची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. पीक संशोधनात वाणाचे नाव, प्रसारित केल्याचे वर्ष, जमिनीचा प्रकार, हवामान, लागवडीचा कालावधी, प्रतिएकर लागणारे बियाणे, पीक व्यवस्थापन, पिकाचा कालावधी, उत्पादकता, वाणाची वैशिष्ट्ये-विशेष गुणधर्म, वाणासंबंधी छायाचित्रे आदी इत्थंभूत माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर पीक शिफारशींमध्ये पीक-वाणाचे नाव, वर्ष, खत व्यवस्थापनाबद्दलच्या शिफारशी, पीक व्यवस्थापनाबद्दलच्या इतर शिफारशी, लागवडीविषयी तंत्रज्ञान व शिफारशी, पाणी व्यवस्थापनाबद्दलच्या शिफारशी, कीड व रोग व्यवस्थापन आदींबद्दलची सर्व माहिती देण्यात आली आहे. पशुधनाच्या बाबतीत संबंधित पशूची शारीरिक, प्रजनन, जातीची ठळक वैशिष्ट्ये, दूध उत्पादन व दुधातील घटक, तसेच छायाचित्रे आदी माहिती देण्यात आली आहे.
 


इतर अॅग्रो विशेष
दराबाबतचा दुटप्पीपणा घाऊक आणि किरकोळ बाजारांतील कांद्याचे वाढते दर...
खातेवाटप जाहीर : सुभाष देसाईंकडे कृषी,...मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...
फळबागांच्या माध्यमातून प्रगतिपथावर वडकी पुणे शहरापासून जवळ असलेले वडकी हे दुष्काळी गाव...
गाई, म्हशीच्या सुलभ प्रसूतीसाठी ‘शुभम’...माळेगाव, जि. पुणे ः शेती, पशुपालन करताना येणाऱ्या...
विदर्भात गारपिटीची शक्यतापुणे ः पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याने...
कांद्यानंतर 'या' पिकावर साठा मर्यादा...नवी दिल्ली: देशात यंदा कडधान्याचे उत्पादन...
‘पीजीआर’साठी जाचक नियमावली नकोपुणे : बिगर नोंदणीकृत जैव उत्तेजकांना (...
अपरिपक्व कांदा आवकेचा दरवाढीवर परिणामनवी दिल्ली: उन्हाळी आणि खरीप कांदा उत्पानातील...
भांडवली शेतीचा विळखा बघता बघता हरितक्रांतीला पन्नास वर्षे झाली. तसे,...
पशुखाद्य : नियोजन अन् नियंत्रणमहाराष्ट्रात २०१२ च्या दुष्काळापासून दुग्ध...
मराठवाड्यात साडेदहा हजार एकरांवर तुतीऔरंगाबाद : मराठवाड्यात यंदा ३० नोव्हेंबर...
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सहा दिवस...मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या...
विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदीपंढरपूर, जि. सोलापूर ः श्री विठ्ठल मंदिराच्या...
धानासाठी क्विंटलला पाचशे रुपये अनुदानमुंबई: राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा...
‘पीजीआर’ला मान्यतेचा मार्ग मोकळापुणे ः देशभरात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या बिगर...
इथेनॉलसाठी मान्यता; पण प्रकल्पांसाठी...पुणे  : थेट साखरेपासून इथेनॉल तयार करण्यास...
उत्कृष्ट व्यवस्थापनातून पपईत मिळवली ओळखनंदुरबार जिल्ह्यात धमडाई येथील सुभाष व प्रनील या...
उद्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः बंगाल उपसागराच्या आग्नेय भागात कमी दाबाचे...
परिश्रमपूर्वक व्यवस्थापनातून...पुणे जिल्ह्यातील रिहे येथील सुनील शिंदे...
किरकोळ व्यापाऱ्यांकरिता कांदासाठा...मुंबई ः देशात कांद्याचे उत्पादन घटल्याने...