राहुरी कृषी विद्यापीठाच्या चारही संशोधन केंद्रांचे कर्मचारी संपावर

महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी संलग्न विभागीय कृषी संशोधन केंद्र, कांदा द्राक्ष संशोधन केंद्र , गहू संशोधन केंद्र , डाळिंब संशोधन व तंत्रज्ञान विस्तार केंद्रातील अधिकारी व कर्मचारी संपावर गेले आहेत.
employee on strike
employee on strike

नाशिक : महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी संलग्न विभागीय कृषी संशोधन केंद्र (इगतपुरी), कांदा द्राक्ष संशोधन केंद्र (पिंपळगाव बसवंत, ता. निफाड), गहू संशोधन केंद्र (कुंडेवादी, ता. निफाड), डाळिंब संशोधन व तंत्रज्ञान विस्तार केंद्र (लखमापूर, ता. सटाणा) येथील अधिकारी व कर्मचारी संपावर गेले आहेत. शासनाने मागण्यांचा विचार करून दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.   राज्यात सातवा वेतन लागू करण्यात आला. मात्र, या लाभापासून राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील जवळपास अधिकारी व कर्मचारी वंचित आहेत. सातव्या आयोगाचा लाभ मिळावा, या मागणीसाठी जिल्ह्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी २७ ऑक्टोबरपासून १ नोव्हेंबरपर्यंत काळ्या फिती लावून कामकाज सुरू केले. परंतु, मागणीची दखल न घेतल्याने २ ते ५ नोव्हेंबरपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता फक्त स्वाक्षरी करून कामबंद आंदोलन पुकारण्यात आले. तर शुक्रवारी (ता. ६) सामूहिक रजा आंदोलन केले. त्यानंतर शनिवार (ता. ७) पासून मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत बेमुदत कामबंद आंदोलनाचा निर्णय कृषी विद्यापीठाच्या कर्मचारी संघटनांनी घेतला.   सोमवार (ता. ९) पासून पुन्हा लेखणी बंद आंदोलन पुकारण्यात येणार आहे. मंगळवारी (ता.१०) याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बैठक असल्याने नेमका काय निर्णय होतो, हे पाहणे अपेक्षित आहे.

प्रक्षेत्रावर काम सुरूच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असला, तरी  हंगामनिहाय सोयाबीन काढणी लखमापूर केंद्राच्या प्रक्षेत्रावर सुरू आहे. तर कृषी विद्यापीठाच्या जैव उत्पादने व बियाण्यांची विक्री कुंदेवादी येथे होत आहे. शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी कामकाज सुरू आहे, असे संबंधित केंद्राच्या सूत्रांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com