मुंबई : कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक क्रांतिकारक पाऊल आहे.
ताज्या घडामोडी
कृषी संशोधन केंद्रे पांढरा हत्ती ठरू नयेत ः नाना पटोले
भंडारा ः सर्वाधिक रोजगार शेतीमधून उपलब्ध होऊ शकतो. याकरिता कृषी शास्त्रज्ञांनी मोलाचे प्रयत्न करण्याची गरज आहे. संशोधन केंद्रे पांढरे हत्ती ठरू नये, असे मत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी लाखनी येथे आयोजित शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शनात व्यक्त केले.

या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, पंचायत समिती सभापती खुशाल गिदमारे, उपविभागीय अधिकारी मनीषा दांडगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण, उमेदचे राजेंद्र इंगळे, कृषिभूषण शेतकरी रामचंद्र कापगते, शेषराव निखाडे, यादोराव मेश्राम, डॉ. जी. आर. शामकुवर, भूपेंद्रपालसिंग, आकाश कोरे, ज्ञानेश्वर रहांगडाले, तहसीलदार माणिक विराणी, गटविकास अधिकारी धीरज पाटील, कृषी विकास अधिकारी रोहिणी डोंगरे, तालुका कृषी अधिकारी पदमाकर गिदमारे, केव्हीकेचे डॉ. एस. एन. वझिरे, सविता तिडके उपस्थित होते.
नाना पटोले म्हणाले, ‘‘आधुनिक काळामध्ये रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात असल्याने खताची सवय होऊन पिकासाठी जमीन मृत झाल्यासारखी झाली आहे. त्याकरिता उपजाऊ जमीन राहण्याकरिता जमिनीची आरोग्यपत्रिका पाहून खतांचा वापर करावा.’’
आजच्या युगात महिला शेतकऱ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होत असून, या वेळी कृषी विभागाच्या वतीने यांत्रिकीकरण योजनेतून ग्राम सावरी येथील ललिता फुलेकर, पोहरा येथील विष्णू गिऱ्हेपुंजे या लाभार्थ्यांना ट्रॅक्टरवाटप करण्यात आले. सूत्रसंचालन पदमाकर गिदमारे यांनी केले. सुचित लकडे यांनी आभार मानले.
- 1 of 1022
- ››