डाळिंबातील औषधीगुणधर्म टिकविण्याकरिता संशोधन

डाळींब
डाळींब

सोलापूर : जुळे सोलापूर येथील फार्मसी महाविद्यालय व राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र यामध्ये सामंजस्य करार होणार आहे, याबाबत बोलणी पूर्ण झाली असून, लवकरच करारावर शिक्कामोर्तब होणार आहे. कॅन्सरसहित (आतड्याचा कॅन्सर) इतर आजारावर संशोधन करण्यासाठी हा करार करण्यात येणार आहे, अशी माहिती फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य आर. वाय. पाटील यांनी दिली.  डाळिंब संशोधन केंद्राने यापूर्वी विविध आजारांवर औषध म्हणून संशोधन केले आहे. या संशोधनाला वैद्यकीय मान्यता मिळावी म्हणून फार्मसी महाविद्यालयाचे सहकार्य असणार आहे. फार्मसी महाविद्यालय व डाळिंब संशोधन केंद्र यांच्यातील प्रमुख संशोधक एकत्र येऊन महाविद्यालय व डाळिंब संशोधन केंद्रात संशोधन करतील. डाळिंबापासून तयार करण्यात येणाऱ्या औषधांमध्ये नैसर्गिकपणा टिकवून ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. लहान मुलांसाठी औषध असल्यास त्याची चव कशी ठेवावी, औषध जास्त वेळ टिकण्यासाठी प्रक्रिया, औषधांचे निर्जंतुकीकरण, डाळिंबातील नैसर्गिक तत्त्व वेगळे करणे, त्वचेच्या आजारावर (सोरायसिस) औषधे तयार करणे आदी बाबींवर संशोधन करण्यात येणार आहे. या संशोधनामुळे सोलापुरात डाळिंबाची मागणी वाढून त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. डाळिंबासाठी एक मोठी बाजारपेठ निर्माण होऊ शकते. फार्मसी महाविद्यालयातील अनुभवी प्राध्यापक व डाळिंब संशोधन केंद्रातील तज्ज्ञ एकत्र येऊन विविध आजारांवर औषधे तयार करू शकतात. दोन्ही क्षेत्रांतील तज्ज्ञ एकत्र आल्यावरच हे शक्‍य होऊ शकते, यासाठीच हा करार करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com