agriculture news in Marathi, Research for preserve medicinal properties from pomegranate, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

डाळिंबातील औषधीगुणधर्म टिकविण्याकरिता संशोधन
टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 डिसेंबर 2017

सोलापूर : जुळे सोलापूर येथील फार्मसी महाविद्यालय व राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र यामध्ये सामंजस्य करार होणार आहे, याबाबत बोलणी पूर्ण झाली असून, लवकरच करारावर शिक्कामोर्तब होणार आहे. कॅन्सरसहित (आतड्याचा कॅन्सर) इतर आजारावर संशोधन करण्यासाठी हा करार करण्यात येणार आहे, अशी माहिती फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य आर. वाय. पाटील यांनी दिली. 

सोलापूर : जुळे सोलापूर येथील फार्मसी महाविद्यालय व राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र यामध्ये सामंजस्य करार होणार आहे, याबाबत बोलणी पूर्ण झाली असून, लवकरच करारावर शिक्कामोर्तब होणार आहे. कॅन्सरसहित (आतड्याचा कॅन्सर) इतर आजारावर संशोधन करण्यासाठी हा करार करण्यात येणार आहे, अशी माहिती फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य आर. वाय. पाटील यांनी दिली. 

डाळिंब संशोधन केंद्राने यापूर्वी विविध आजारांवर औषध म्हणून संशोधन केले आहे. या संशोधनाला वैद्यकीय मान्यता मिळावी म्हणून फार्मसी महाविद्यालयाचे सहकार्य असणार आहे. फार्मसी महाविद्यालय व डाळिंब संशोधन केंद्र यांच्यातील प्रमुख संशोधक एकत्र येऊन महाविद्यालय व डाळिंब संशोधन केंद्रात संशोधन करतील.

डाळिंबापासून तयार करण्यात येणाऱ्या औषधांमध्ये नैसर्गिकपणा टिकवून ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. लहान मुलांसाठी औषध असल्यास त्याची चव कशी ठेवावी, औषध जास्त वेळ टिकण्यासाठी प्रक्रिया, औषधांचे निर्जंतुकीकरण, डाळिंबातील नैसर्गिक तत्त्व वेगळे करणे, त्वचेच्या आजारावर (सोरायसिस) औषधे तयार करणे आदी बाबींवर संशोधन करण्यात येणार आहे.

या संशोधनामुळे सोलापुरात डाळिंबाची मागणी वाढून त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. डाळिंबासाठी एक मोठी बाजारपेठ निर्माण होऊ शकते. फार्मसी महाविद्यालयातील अनुभवी प्राध्यापक व डाळिंब संशोधन केंद्रातील तज्ज्ञ एकत्र येऊन विविध आजारांवर औषधे तयार करू शकतात. दोन्ही क्षेत्रांतील तज्ज्ञ एकत्र आल्यावरच हे शक्‍य होऊ शकते, यासाठीच हा करार करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.

इतर अॅग्रो विशेष
बागलाण तालुक्यात पूर्वहंगामी...नाशिक ः पूर्वहंगामी अर्ली द्राक्ष उत्पादनासाठी...
नांदेड, परभणी जिल्ह्यात गुलाबी बोंड...परभणी: परभणी, नांदेड जिल्ह्यांतील बीटी कपाशीवरील...
राज्यात पावसाची उघडीपपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला मुसळधार...
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ऊस...कोल्हापूर : साखर कारखाने म्हटले की सर्वांच्या...
परभणी दुग्धशाळेतील संकलनात सव्वादोन लाख...परभणीः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील...
आवळा प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखजाचकवस्ती (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील सुमन...
फळबागेतून शेती केली किफायतशीरकनका बुद्रुक (ता. मेहकर, जि. बुलडाणा) शिवारात...
युवा शेतकऱ्याने केले यशस्वी ब्रॉयलर...लातूर जिल्ह्यातील हडोळती येथील महेश गोजेवाड या...
मराठवाड्यातील खरिपावर संकटाचे ढग गडदऔरंगाबाद : गेल्या हंगामात दुष्काळाने पिचलेल्या...
दक्षिण महाराष्ट्रात उसाचे वैभव लयालाकोल्हापूर/सांगली : पंचगंगा, कृष्णा, वारणा,...
तीन लाखाची लाच घेताना नाशिक बाजार...नाशिक: नाशिक  कृषी उत्पन्न बाजार...
कातळावर लिली; तर टायरमध्ये फुलला...रत्नागिरी जिल्ह्यातील मेर्वी येथील प्रगतिशील...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यतापुणे ः पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब...
कोल्हापूरमध्ये पुरात घट, धरणातून विसर्ग...कोल्हापूर  : जिल्ह्यातील पुराची परिस्थिती...
ग्लायफोसेट तणनाशक कर्करोगकारक नाही :...वॉश्‍गिंटन : ग्लायफोसेट हे तणनाशक मानवास कर्करोग...
ऑगस्ट महिन्यातही पाणीटंचाई कायम; २ हजार...पुणे : पावसाने दमदार हजेरी लावल्याने कोकण,...
पिंपळगावकरांनी भाजीपाला शेतीतून साधली... बीड जिल्ह्यात अहमदनगर- अहमदपूर राज्य...