संशोधन नेहमी नावीन्यपूर्ण असावे : डॉ. पातूरकर

संशोधन नेहमी नावीन्यपूर्ण असावे : डॉ. पातूरकर
संशोधन नेहमी नावीन्यपूर्ण असावे : डॉ. पातूरकर

अकोला : संशोधन हे नेहमी नावीन्यपूर्ण, सर्वसमावेशक असावे. यात कुठलाही एक विभाग अथवा व्यक्ती महत्त्वाचा नाही. हे एक सांघिक काम आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून शेतकऱ्यांच्या सोयीचे संशोधन करणे आवश्यक आहे, असे मत महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर यांनी व्यक्त केले.

स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेच्या स्थापनेच्या सुवर्णवर्षानिमित्त पशू प्रजनन विभागातर्फे तिसरी एकदिवसीय राज्यस्तरीय चिकित्सालयीन परिषद झाली. अध्यक्षस्थानी डॉ. हेमंत बिराडे होते. स्नातकोत्तर पशुवैद्यक महाविद्यालयाचे वरिष्ठ प्रा. डॉ. चैतन्य पावसे, डॉ. मिलिंद थोरात, संयोजक डॉ. श्याम देशमुख उपस्थित होते.

महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठातंर्गत घटक महाविद्यालयाचे २०० विद्यार्थी सहभागी झाले होते. या वेळी पशू औषधोपचार शास्त्र, पशुप्रजनन शास्त्र, पशू चिकित्साशास्त्र आणि रोगनिदानसंबंधी चिकित्सालयीन प्रकरणांचे सादरीकरण करण्यात आले. या परिषदेत वरिष्ठ प्रा. डॉ. एस. व्ही. कुरळकर, डॉ. एस. पी. वागमारे, डॉ. के. एस. पजई, डॉ. महेश इंगवले, डॉ. सुनील हजारे, डॉ. रणजित इंगोले, डॉ. प्राजक्ता कुरळकर, डॉ. प्रवीण बनकर, डॉ. आनंद रत्नपारखी आदींचा सहभाग होता. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com