मुंबई ः येत्या सोमवारपासून नागपूर येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्त
बातम्या
जलसंवर्धन आणि नियोजनासाठी संशोधनात्मक अभ्यास हवा ः डॉ. तेजनकर
औरंगाबाद : ज्याप्रमाणे अन्नधान्य टंचाईच्या काळात वैज्ञानिक आणि संशोधनात्मक कार्य झाल्यामुळे आपल्याकडे अन्नधान्याची मुबलकता निर्माण झाली. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील भूजलाचा, मृदेचा आणि खडकांचा जलसंवर्धन आणि जल नियोजनासाठी संशोधनात्मक अभ्यास झाला पाहिजे. पाणी पुनर्भरणासाठी यावर विविध प्रयोगांचा अवलंब केला पाहिजे. या विषयावर अभ्यास करणाऱ्या संस्था राज्यात वाढविण्याची गरज डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डाॅ. अशोक तेजनकर यांनी व्यक्त केली.

जल व भूमि व्यवस्थापन संस्था वाल्मी येथे नुकत्याच आयोजित केलेल्या एक दिवसीय जल जागृती कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी भाषणात डॉ. तेजनकर बोलत होते.
या वेळी व्यासपीठावर वाल्मीचे सहसंचालक इंजि. व्ही. बी. नाथ, विभागीय जलसाक्षरता केंद्राचे संचालक प्रा. डॉ. राजेश पुराणिक यांच्यासह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते. मृद व जलसंधारण आयुक्तालय, विभागीय जलसाक्षरता केंद्र आणि जल व भूमि व्यवस्थापन संस्था, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. तेजनकर म्हणाले, ‘‘पाणी या विषयाकडे विज्ञान म्हणून पाहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून जल नियोजन केल्यास निश्चितच दुष्काळावर मात करता येईल. सगळ्यांना पाणी हा सहज सोपा विषय वाटातो. इतर राज्यात सरासरी पाऊस पडूनही पाणीटंचाई किंवा दुष्काळाचा सामना तेथील जनतेला करावा लागत नाही. परंतु महाराष्ट्रात मात्र ही परिस्थिती वारंवार निर्माण होते. कारण आपण फक्त जमिनीवर पडणाऱ्या व जमिनीवर वाहणाऱ्या पाण्याचे नियोजन करतो. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेऊन भूजलातील पाण्याचे नियोजन करणे आज आवश्यक झाले आहे. ’’
इंजि. श्री. नाथ म्हणाले, ‘‘आज पाण्यावर पोटतिडकीने काम करण्याची व जलसाक्षरता तळागळापर्यंत पोचविण्याची नितांत गरज आहे.’’
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. पुराणिक यांनी केले. प्रा. डॉ. हर्षदा देशमुख यांनी जल प्रतिज्ञा दिली. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बी. एम. शेटे यांनी केले.
- 1 of 921
- ››