नांदेडमधील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

नांदेडजिल्ह्यातील आगामी काळात सार्वत्रिक निवडणुका होणाऱ्या १ हजार ३०९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण गुरुवारी (ता. १९) संबंधित तहसील कार्यालय स्तरावर जाहीर झाले. यात पन्नास टक्के सरपंच पदाच्या जागा महिलांसाठी आरक्षीत झाल्या आहेत.
 नांदेडमधील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर Reservation announced for the post of Sarpanch of Gram Panchayat in Nanded
नांदेडमधील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर Reservation announced for the post of Sarpanch of Gram Panchayat in Nanded

नांदेड : जिल्ह्यातील आगामी काळात सार्वत्रिक निवडणुका होणाऱ्या १ हजार ३०९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण गुरुवारी (ता. १९) संबंधित तहसील कार्यालय स्तरावर जाहीर झाले. यात पन्नास टक्के सरपंच पदाच्या जागा महिलांसाठी आरक्षीत झाल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात एकूण एक हजार ३०९ ग्रामपंचायती आहेत. यात बिगर आदिवासी एक हजार १६६ तर अनुसूचित क्षेत्रात (आदिवासी) १४३ ग्रामपंचायती आहेत. आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरपंचपदांचे आरक्षण गुरुवारी (ता. १९) संबंधित तहसील कार्यालयात झाले. यात अनुसूचित जाती, जमाती, मागासवर्गीय प्रवर्ग व खुला प्रवर्ग असा कोटा निश्चित करण्यात आला आहे. गुरुवारी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झालेल्या बिगर अनुसूचित क्षेत्रातील एक हजार १६६ ग्रामपंचायतीत अनुसूचित जातीसाठी २२८ ग्रामपंचायतीचे सरपंच पद राखीव ठेवण्यात आले. यात अनुसूचित जमातीसाठी ८२, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) ३१५ तर खुल्या गटासाठी ५४१ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले. तर अनुसूचित क्षेत्रात येणाऱ्या १४३ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदे अनुसूचित जमाती करिता निश्चित केली आहे. त्यातील ७२ पदे महिलांसाठी निश्चित करण्यात आली आहेत. सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक ठिकाणी जागा आरक्षीत झाल्या आहेत. दरम्यान, नांदेडमधील निवडणूक प्रक्रिया सुरू झालेल्या शंभर ग्रामपंचायतीचा कार्यक्रम रद्द झाला आहे. या ठिकाणी नव्याने प्रक्रिया होणार आहे. नांदेडमधील शंभर ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम रद्द  ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कोविडमुळे स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने रद्द केल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी गुरुवारी (ता. १९) केली. यामुळे नांदेड जिल्ह्यामधील निवडणूक प्रक्रिया सुरू झालेल्या शंभर ग्रामपंचायतीचा कार्यक्रम रद्द झाला आहे. या ठिकाणी नव्याने प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळाली.  राज्यातील १९ जिल्ह्यांतील एक हजार ५६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २४ फेब्रुवारी २०२० रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार ता. ३१ मार्च २०२० रोजी मतदान होणार होते; परंतु कोविडची परिस्थिती उद्‌भवल्याने ता. १७ मार्च २०२० रोजी उमेदवारी अर्ज छाननीच्या टप्प्यावर हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला. यानंतर परिस्थितीत बदल झाल्यानंतर आहे त्या टप्यावरुन पुढे कार्यक्रम सुरु राहील असे सांगण्यात आले होते. परंतु राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी (ता. १९) ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कोविडमुळे स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम आता रद्द केला. या ठिकाणी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे, अशी घोषणा केल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील शंभर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम पुन्हा जाहीर होणार आहे. यापूर्वी पॅनल प्रमुखांनी केलेला खर्च पाण्यात गेला आहे.  

निवडणूक कार्यक्रम रद्द झालेल्या तालुकानिहाय ग्रामपंचायती नांदेड : ब्राम्हणवाडा, कामठा खुर्द, बोंडार तर्फे हवेली, आलेगाव, दर्यापूर, पिंपरी महिपाल, कोटतीर्थ, वाडी पुयड, वडगाव, इंजेगाव, फत्तेपूर, कांकाडी, किकी, धनगरवाडी, खुपसरवाडी, विष्णुपुरी, भनगी, कल्लाळ, पिंपळगाव निमजी, गंडेगाव, नांदुसा/भालकी, वडवणा/खडकी, तळणी, चिखली बुद्रुक.

अर्धापूर : गणपूर व सांगवी - खडकी. मुदखेड : पिंपळकौठा चोर व पांढरवाडी. हदगाव : पिंगळी. हिमायतनगर : चिंर्चोडी, सवना ज., एकघरी, वाघी व महादापूर. किनवट : आंदबोरी इ., बोधडी बु., दहेगाव ची., गोंडेमहागाव, करंजी हुडी, कुपटी बु., लिंगी, मलकवाडी, मदनापूर ची., मलकापूर खेर्डा.

बिलोली : खतगाव, रामतीर्थ, हुनगुंदा, किनाळा, पोखर्णी, तोरणा, चिंचाळा, रामपूर थडी, हिप्परगा माळ, केसराळी. नायगाव : खैरगाव - होटाळा, टाकळी तब, नावंदी, रातोळी, शेळगाव छत्री, मांडणी.

देगलूर : तुपशेळगाव.

मुखेड : शिरूर दबडे, कोटग्याळ, आडलूर/नंदगाव, सांगवी भादेव, गोणेगाव, चव्हाणवाडी, आखरगा, हिप्परगा दे, उंद्री पदे, सांगवी बेनक, चिवळी, बेरळी बुद्रुक, बेरळी खुर्द, धनज/जामखेड, डोरनाळी, राजुरा तांडा, मेथी खपराळ, तग्याळ, मंडलापूर, वर्ताळा, येवती, राजुरा बुद्रुक, मारजवाडी, इटग्याळ पदे.

कंधार : बाचोटी, बोरी खुर्द, मरशिवणी, संगूची वाडी. लोहा ः जोशी सांगवी, कामळज, जोमेगाव, बोरगाव आ., हळदव, चितळी, धानोरा म., कलंबर बुद्रुक, मुरंबी,  गौडगाव.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com