चारा पिकांकरिता पाणी आरक्षित करा : पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार 

बोर प्रकल्पातील पाण्याचे नियोजन करताना गहू, हरभरा आणि उन्हाळी पीक घेताना जनावरांच्या चाऱ्यासाठी घेण्यात येणाऱ्या पिकांकरिता प्राधान्य द्यावे, अशी सूचना पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास मंत्री तसेच पालकमंत्री सुनील केदार यांनी केली.
चारा पिकांकरिता पाणी आरक्षित करा : पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार  Reserve water for fodder crops: Animal Husbandry, Dairy Development Minister Sunil Kedar
चारा पिकांकरिता पाणी आरक्षित करा : पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार  Reserve water for fodder crops: Animal Husbandry, Dairy Development Minister Sunil Kedar

वर्धा  : बोर प्रकल्पातील पाण्याचे नियोजन करताना गहू,  हरभरा आणि उन्हाळी पीक घेताना जनावरांच्या चाऱ्यासाठी घेण्यात येणाऱ्या पिकांकरिता प्राधान्य द्यावे, अशी सूचना पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास मंत्री तसेच पालकमंत्री सुनील केदार यांनी केली.  जिल्हा परिषद सभागृहात सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली बोर प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. या वेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता जे. जी. गवळी, कार्यकारी अभियंता राहणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, उपवनसंरक्षक सुनील शर्मा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे यावेळी उपस्थित होते.  या वर्षी बोर प्रकल्प पूर्ण भरला असून, सिंचनासाठी ९८.७७ दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक आहे. यातून १३ हजार ५०० हेक्टरक्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते. याचे नियोजन करताना कृषी विभागाचा सक्रिय सहभाग दिसत नसल्याबाबत सुनील केदार यांनी नाराजी व्यक्त केली. कापसावर गेल्या तीन वर्षांपासून गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होत आहे. यासाठी शासन शेतकऱ्यांना फरदड (खोडवा) न घेण्याचे आणि एप्रिल मेपर्यंत कापसाचे उत्पादन न लांबवण्याबद्दल सातत्याने जागृती करीत आहे. असे असतानाही सिंचनासाठी पाण्याचे नियोजन करताना नोव्हेंबरच्या पुढे कापसाकरिता ५० टक्के पाणी का आरक्षीत ठेवण्यात आले? या बाबत केदार यांनी आक्षेप घेतला. या वर्षी शिल्लक पाण्याचा उपयोग गहू आणि हरभरा पिकाच्या क्षेत्रात वाढीसाठी करण्याची सूचना त्यांनी केली. शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न कसे वाढविता येईल याचा विचार करून पिकाचे पद्धतीत बदल करावा. गहू ५० टक्के आणि हरभरा २५ टक्के तसेच इतर पिकांसाठी २५ टक्के या प्रमाणे पाण्याचे नियोजन करण्याची सूचना केदार यांनी केली. पिण्याच्या पाण्यासाठी आजूबाजूच्या गावातील ग्रामपंचायतींची मागणी नाही, या बाबत खात्री करण्याचे निर्देश देण्यात आले. प्रकल्पाची निर्मिती सिंचन क्षमता आणि प्रत्यक्ष होणारे सिंचन यावर चर्चा करताना उद्दिष्टापेक्षा सिंचन कमी होण्याच्या कारणांचा शोध घेण्याची सूचनाही त्यांनी केली. कालवे, पाटचऱ्या नादुरुस्त असतील तर दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com