agriculture news in marathi, Reserved for water supply schemes in the project | Agrowon

परभणी जिल्ह्यात प्रकल्पांतील पाणीसाठा योजनांसाठी आरक्षित
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

परभणी ः जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन विविध मोठे, मध्यम, लघू प्रकल्पांचे जलाशये तसेच गोदावरी नदीवरील बंधाऱ्यांतील मिळून एकूण ९३.४५८ दलघमी पाणीसाठा १५ जुलै २०१९ पर्यंत आरक्षित करण्यात आला. या संदर्भात सूत्रांनी माहिती दिली.

परभणी ः जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन विविध मोठे, मध्यम, लघू प्रकल्पांचे जलाशये तसेच गोदावरी नदीवरील बंधाऱ्यांतील मिळून एकूण ९३.४५८ दलघमी पाणीसाठा १५ जुलै २०१९ पर्यंत आरक्षित करण्यात आला. या संदर्भात सूत्रांनी माहिती दिली.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षेतेखाली बुधवारी (ता. २४) जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या वेळी खासदार संजय जाधव, आमदार मोहन फड, जिल्हाधिकारी पी. शिवशंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी., महानगरपालिका आयुक्त रमेश पवार, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे तसेच विविध पाटबंधारे प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, महावितरणचे अधिकारी आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील टंचाईसदृश परिस्थितीत पिण्याच्या पाण्याची गरज ओळखून सर्व गावांतील पाण्याचे नियोजन, विविध प्रकल्पांतील उपलब्ध पाणीसाठा, उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याची गरज जलसंपदा विभाग तसेच जिल्हा परिषदेने केलेल्या नियोजनाचा आढावा श्री. पाटील यांनी घेतला. परभणी शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी निम्न दुधना आणि सिद्धेश्वर या दोन प्रकल्पांतील पाणी आरक्षित करण्यात आले. जायकवाडी प्रकल्पातील मानवत तालुक्यातील १९ आणि गंगाखेड तालुक्यातील ४ गावांसाठी ०.१९३ दलघमी पाणीसाठा आरक्षित करण्यात आले.

येलदरी प्रकल्पातील २.८६० दलघमी पाणीसाठा जिंतूर नगर परिषदेसाठी राखीव ठेवण्यात आला. सिद्धेश्वर प्रकल्पातील परभणी महानगरपालिका तसेच पूर्णा नगर परिषद, तसेच वस्सा पाणीपुरवठा योजनेसाठी मिळून एकूण ३०.६२२ दलघमी पाणीसाठा आरक्षित करण्यात आला. निम्न दुधना प्रकल्पातील परभणी महानगरपालिका, पूर्णा नगर परिषद, सेलू, मानवत, परभणी तालुक्यांतील विविध गावांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी मिळून एकूण १९.९०८ दलघमी पाणीसाठा आरक्षित करण्यात आला. करपरा मध्यम प्रकल्पातील ०.०२० दलमी  पाणीसाठा कुपटा, कौसडी, कान्हड, बोरी गावांसाठी आणि मासोळी मध्यम प्रकल्पातील ३.२ दलघमी गंगाखेड नगर परिषदेसाठी आरक्षित केले आहे.

पालकमंत्र्यांनी केल्या विविध सूचना
पालकमंत्री पाटील यांनी निम्नदुधना प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक तत्काळ घेऊन पाणीपाळ्या सोडण्याचे नियोजन करण्यात यावे. गोदावरील नदीवरील मुळी आणि दुधना नदीवरील मोरेगांव येथील बंधाऱ्यांना गेट बसविण्याच्या कामाला गती देण्यात यावी, प्रतिबंधात्मक आदेशाचे काटेकोर पालन करावे. महावितरणने ग्रामीण भागात अखंड वीजपुरवठा द्यावा. भारनियमन कमी करावे, असे निर्देश श्री. पाटील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...